पाक संसदेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी चिनी कॅमेराद्वारे गुपचूप छायाचित्रिकरण

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानी संसदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु होते. तेव्हा त्याचे चायनीज बनावटीच्या कॅमेराने गुप्त छायाचित्रण सुरु असल्याचे उघड झाले. त्यावरून संसदेत गदारोळ उडाला. Secret photography by a Chinese camera during the presidential election in the Pakistani parliament

अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक गुप्त पद्धतीने घेतली जात असताना हा प्रकार उघड झाला. विशेष म्हणजे 48 नव्या सदस्यांनी खासदार म्हणून शपथ घेतली. त्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदातसाठी निवडणूक घेण्यात आली. तेव्हा त्याचे गुप्तरित्या चायनीज बनावटीच्या कॅमेराद्वारे चित्रीकरण केले जात होते.पाकिस्तानात खासदार सहा वर्षांसाठी निवडले जातात. अर्ध्याहून अधिक खासदारांचा कार्यकाळ समाप्त झाला आहे. त्यामुळे दर तीन वर्षांनी नव्या सदस्यांची निवड होते. त्याप्रमाणे नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडही होते.

Secret photography by a Chinese camera during the presidential election in the Pakistani parliament

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*