भारतातील दोन लसींनी आत्मनिर्भर भारताचे स्वप्न वैज्ञानिकांनी पूर्ण केले, पंतप्रधानांनी केले कौतुक

काळजी आणि करुणेचे मूळ असलेल्या आत्मानिर्भर भारतचे स्वप्न आपल्या वैज्ञानिकांनी पूर्ण केले. भारतीयांचे अभिनंदन आणि आपल्या शास्त्रज्ञांनी केलेल्या मेहनतीबद्दल धन्यवाद…अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. Scientists fulfill dream of atmnirbhar bharat with two vaccines in India, PM praises


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काळजी आणि करुणेचे मूळ असलेल्या आत्मानिर्भर भारतचे स्वप्न आपल्या वैज्ञानिकांनी पूर्ण केले. भारतीयांचे अभिनंदन आणि आपल्या शास्त्रज्ञांनी केलेल्या मेहनतीबद्दल धन्यवाद…अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे.

ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन आणि सीरम इंस्टीट्यूटच्या कोविशील्डला परवानगी दिली आहे. याशिवाय, जायडल कॅडिला हेल्थकेअरच्या जायकोव-डी ला फेज-3 ट्रायल्ससाठी परवानगी देण्यात आली आहे.पंतप्रधान म्हणाले की, आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आलेल्या दोन लसी भारतात तयार झाल्या आहेत, याचा प्रत्येकाला अभिमान आहे. भारत आत्मनिर्भर होत आहे. कोरोनाच्या दोन लशींना नुकतीच परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सीरम इंस्टीट्यूटच्या कोविशील्डला परवानगी देण्यासाठी शिफारस करण्यात आली होती. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या तज्ज्ञ समितीने दोन दिवसांपूर्वी ही शिफारस केली होती. कोव्हॅक्सिनच्या फेज-2 क्लिनिकल ट्रायल्सचे परीणाम 23 डिसेंबरला समोर आले होते.

Scientists fulfill dream of atmnirbhar bharat with two vaccines in India, PM praises

ट्रायल्स 380 मुले आणि वृद्धांवर घेण्यात आल्या होत्या. 3 मायक्रोग्राम आणि 6 मायक्रोग्रामचे दोन फॉर्म्युले ठरवण्यात आले. दोन ग्रुप्स बनवण्यात आले. त्यांना दोन डोस चार आठवड्यांच्या अंतराने दिले. फेज-2 ट्रायल्समध्ये कोव्हॅक्सिनने हाय लेव्हल अँटीबॉडी तयार केली. दुसºया व्हॅक्सीनेशनच्या तीन महिन्यानंतर सर्व स्वयंसेवकांमध्ये अँचीबॉडीची संख्या वाढली. ट्रायल्सच्या परीणांमांच्या आधारे कंपनीने दावा केला आहे की, कोव्हॅक्सिनमुळे शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडी सहा ते बारा महिन्यांपर्यंत शरीरात राहतील. कंपनीचा दावा आहे की, फेज-3 साठी देशभरात सर्वाधिक 23 हजार स्वयंसेवकांवर चाचणी झाली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*