एखादे शाळा-महाविद्यालय उभारले का तुमच्या आई-वडीलांना विचारा, नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांच्यावर टीका


तुम्हाला संधी होती, तेव्हा एखादे शाळा-महाविद्यालय उभारले का, हा प्रश्न तुमच्या आई-वडिलांना विचारा, अशी टीका बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर केली आहे.


वृत्तसंस्था

बेगुसराय : तुम्हाला संधी होती, तेव्हा एखादे शाळा-महाविद्यालय उभारले का, हा प्रश्न तुमच्या आई-वडिलांना विचारा, अशी टीका बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर केली आहे.

बेगुसराय येथील रॅलीमध्ये संबोधित करताना नितीशकुमार म्हणाले की, इतरांना सरकार बनविण्याची संधी मिळाली. तेव्हा त्यांनी बिहारमध्ये काय केले? एखादं शाळा-महाविद्यालय बांधले का? आज तुम्हाला शिकायचे आहे, तर सरकार असताना शाळा-महाविद्यालय बांधले का, हा प्रश्न तुमच्या आई-वडिलांना विचारा. शिक्षण, आरोग्यव्यवस्था यावर भर देण्याऐवजी जंगलराजवर भर देणार्यांनी नोकरी आणि विकासावर बोलणे म्हणजे थट्टाच आहे.

बिहार निवडणूक प्रचारादरम्यान नितीश यांच्याकडून लालूप्रसाद आणि राबडीदेवी सरकारच्या कार्यकाळावरून निशाणा साधला. ते म्हणाले की, सत्तेत असताना यांनी पैसा खाल्ला. तुरुंगात जावं लागल्यानंतर खुर्चीवर पत्नीला आणून बसवलं. आपल्या बिहारमध्ये हे होत होतं. पण, आता माझ्या सरकारमध्ये एखादे चुकीचे कृत्य केले, कायदा मोडला, तर त्याला थेट तुरुंगात जावे लागते.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था