सौदीचा दिवाळी धमाका, पाकव्याप्त काश्मीरला पाकिस्तानच्या नकाशातून वगळले


  • जी – २० समिटच्या पार्शभूमीवर सौदीकडून रियाल नोट प्रसिद्ध, त्यातून नकाशातील बदल दिसला

वृत्तसंस्था

रियाध : सौदी अरेबियानं पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तानला पाकिस्तानच्या नकाशातून हटवलं आहे. पीओकेतील मानवाधिकार कर्यकर्ते अमजद अयुब मिर्झा यांनी बुधवारी ट्विटद्वारे ही माहिती दिली. मिर्झा यांनी सौदीने प्रसिद्ध केलेल्या नकाशाचा फोटो पोस्ट करीत त्याखाली कॅप्शन दिलं की, “सौदी अरेबियाचं भारतासाठी दिवाळी गिफ्ट, गिलगिट-बाल्टिस्तान आणि काश्मीर पाकिस्तानच्या नकाशातून काढून टाकलं.” विशेष म्हणजे या पोस्टनंतर मिर्झा यांचे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आले आहे. (Saudi Arabia removes Pakistan-occupied Kashmir)

टाइम्स नाऊने याची बातमी दिली आहे. अनेक पाश्चिमात्य माध्यमांची दखल घेऊन विविध बातम्या केल्या आहेत. येत्या २१-२२ नोव्हेंबरला सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखाली जी-२० समिट होणार आहे. या पार्श्वभूमीवर सौदी-अरेबियानं २० रियालची बँकनोट प्रसिद्ध केली आहे. या नोटेवर सौदीसह शेजारील राष्ट्र पाकिस्तानचा नकाशा छापला आहे. मात्र, यातून गिलगिट-बाल्टिस्तान आणि पीओके हा भाग वगळला आहे.

दरम्यान, १५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या तथाकथित गिलगिट-बाल्टिस्तान आणि पीओकेतील विधानसभा निवडणुकीचा अहवाल भारतानं पाहिला होता. यावर परराष्ट्र मंत्रालायने सप्टेंबर महिन्यांत कडक आक्षेप घेतला होता. तसेच पाकिस्तान सरकारची कानउघडणी करण्यासाठी भारताने आंदोलनही करून जम्मू आणि काश्मीर, लडाख तसेच कथित गिलगिट-बाल्टिस्तान हे भारताचे अंतर्गत भाग असल्याचे जाहिर केले होते.

Saudi Arabia removes Pakistan-occupied Kashmir

इम्रान खान सरकारने यापूर्वी पाकिस्तानचा नवा नकाशा प्रसिद्ध केला होता. यामध्ये त्यांनी जुनागड येथील भारताचा भूभाग, सर खाडी आणि गुजरातमधील मनवदर तसेच जम्मू आणि काश्मीर, लडाख या भागावर दावा केला होता. भारतानं काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर केंद्र सरकारला विशेष अधिकार मिळाल्याने सौदी अरेबियाने हा नकाशा प्रसिद्ध केल्याचे सांगण्यात येत आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था