सारथी बंद करण्याचा घाट कोणी घातला? संभाजीराजे यांचा सवाल

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यी, स्वयंरोजगार करु इच्छिणारे होतकरू तरुण यांना आर्थिक मदत करणारी तसेच तांत्रिक सहाय्य उपलब्ध करुन देणारी सारथी ही संस्था स्थापन केली. या संस्थेला स्वायत्तता देऊन त्यात सरकारी हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घेतली. मात्र सत्ताबदलानंतर उद्धव ठाकरे-अजित पवार सरकारमधल्या काही मंत्र्यांनी सारथीचे कामकाज नीट चालू नये, असे प्रयत्न केले. या संदर्भात मराठा तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. 

विशेष प्रतिनिधी

मुंबई: राज्य सरकारने सारथी संस्थेला पुन्हा स्वायतत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मराठा समाजाने आत्ताच याबाबत समाधानी न होता, नेमके कोणाच्या सांगण्यावरून सारथी बंद करण्याचा घाट घातला गेला? याची शहानिशा करून घेतली पाहिजे, अशी मागणी छत्रपती संभाजी राजे यांनी केली आहे.

फेसबुकवर यासंदर्भात पोस्ट लिहून संभाजीराजे यांनी आपली भूमिका मांडली आहे. या ते म्हणतात, ‘सारथी’ला आधी जाणीवपूर्वक बदनाम करून स्वायत्तता घालवली. ही स्वायत्तता टिकविण्यासाठी समाजाच्या वतीने आम्ही अनेक आंदोलने केली, जीवनात पहिल्यांदा ‘सारथी’च्या कार्यालयासमोर रस्त्यावर बसून लाक्षणिक उपोषण केले. तसेच हा मुद्दा आजपर्यंत सातत्याने लावून धरल्यामुळे आज ‘सारथी’ संस्थेला स्वायत्तता देण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकले गेल्याचे समजते.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने असलेली आणि मराठा समाजाला दिशा देणारी ही संस्था ठप्प केली गेली. विविध प्रकारचे आरोप करून तिला बदनाम केले गेले. मराठा समाजाचे अमूल्य असे एक ते दीड वर्ष अक्षरश: वाया घालवले. सरकारच्या या निर्णयानंतर संभाजीराजे यांनी सारथीला जाणीवपूर्वक बदनाम करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली आहे.

भ्रष्टाचार आणि तत्सम आरोप सिद्ध तरी करा किंवा जाणीवपूर्वक षडयंत्र रचणाऱ्या मंत्रालयीन अधिकाऱ्याला सस्पेंड तरी करा अशी मागणी या निमित्ताने समाजाच्या वतीने आम्ही करतो आहोत, असे संभाजी राजे यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यी, स्वयंरोजगार करु इच्छिणारे होतकरू तरुण यांना आर्थिक मदत करणारी तसेच तांत्रिक सहाय्य उपलब्ध करुन देणारी सारथी ही संस्था स्थापन केली. या संस्थेला स्वायत्तता देऊन त्यात सरकारी हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घेतली. मात्र सत्ताबदलानंतर उद्धव ठाकरे-अजित पवार सरकारमधल्या काही मंत्र्यांनी सारथीचे कामकाज नीट चालू नये, असे प्रयत्न केले. या संदर्भात मराठा तरुणांमध्ये अस्वस्थता आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*