संजय राऊत भेटायला गेले आणि शेतकऱ्यांकडून फटकारून घेऊन परत आले

सतत लाईमलाईटमध्ये राहण्याचे व्यसन लागलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला भेट देऊन मीडिया कव्हरेज मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, शेतकऱ्यांकडून फटाकारून घेण्याची वेळ त्यांच्यावर आली.Sanjay Raut went to meet him and came back after being farmers


प्रतिनिधी

नवी दिल्ली : सतत लाईमलाईटमध्ये राहण्याचे व्यसन लागलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला भेट देऊन मीडिया कव्हरेज मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, शेतकऱ्यांकडून फटाकारून घेण्याची वेळ त्यांच्यावर आली.

संजय राऊत यांनी आज दिल्लीच्या गाझीपूर सीमेवरील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी त्यांच्याबरोबर शिवसेनेचे इतर खासदारसुद्धा उपस्थित होते. राऊत यांनी यावेळी शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली.



महाविकास आघाडीने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे शेतकऱ्यांच्या संकट काळात त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहीले. शेतकऱ्यांची तडफड व अश्रू अस्वस्थ करणारे आहेत.

पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सूचनेवरून आज गाझीपूर सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांना भेटत आहे, असं ट्वीट संजय राऊत यांनी केले.मात्र, प्रत्यक्षात आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांना चांगलेच फटकारले.

आमची अवस्था चांगली आहे, तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे पाहा. त्यांची अवस्था वाईट आहे अशा शब्दांत शेतकऱ्यांनी त्यांना फटकारले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांइतकी वाईट अवस्था देशात कोठेही नाही. राऊत यांनी अगोदर त्या शेतकऱ्यांची दु;खे समजून घ्यावीत आणि नंतर आम्हाला भेटावे. त्या शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही काम केले तरी ते खूप आहे.

राजकारण करण्यासाठी येथे येऊ नका. तुम्हाला खासदार म्हणून निवडून दिले आहे. आमच्याबाबत काही करायचे असेल तर राज्यसभेत भांडा. आम्ही रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी सक्षम आहोत, असे त्यांनी सांगितले. दिल्लीमध्ये संसदेचे अधिवेशन चालू आहे, त्यामुळे राऊत आले. भारतीय जनता पक्षापासून वेगळे झाल्याने त्यांनाही आंदोलनात आपला सहभाग दाखवावा लागेल, असेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut went to meet him and came back after being farmers

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*