Sanjay Raut Tweet amid thackeray government political crisis

महाराष्ट्रात राजकीय भूकंपानंतर संजय राऊतांची सूचक शायरी, हमको तो बस तलाश नए रास्तों की है…

अँटिलिया प्रकरणाच्या तपासाची झळ आता थेट महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचली आहे. या सर्व राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रविवारी सकाळी शायराना अंदाजात ट्वीट करून सूचक संदेश दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर ठाकरे सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्यावरच यामुळे प्रश्नचिन्ह लागले आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अँटिलिया प्रकरणाच्या तपासाची झळ आता थेट महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचली आहे. या सर्व राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रविवारी सकाळी शायराना अंदाजात ट्वीट करून सूचक संदेश दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर ठाकरे सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्यावरच यामुळे प्रश्नचिन्ह लागले आहे. संजय राऊत यांनी गीतकार जावेद अख्तर यांच्या शायरीला ट्वीट करून लिहिले आहे की, “सुप्रभात, हमको तो बस तलाश नए रास्तों की है, हम हैं मुसाफिर ऐसे जो मंजिल से आए हैं.”

गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप

वास्तविक, या प्रकरणात सचिन वाझे आणि मुंबई पोलिसांतील काही अधिकाऱ्यांभोवती फिरणारी तपासणीची सुई आता महाराष्ट्र सरकारपर्यंत लागली आहे. यामागचे कारण म्हणजे मुंबई पोलीस आयुक्त पदावरून नुकतीच उचलबांगडी करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केलेले खळबळजनक आरोप. परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात सचिन वाजे यांना गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला आहे.देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी

या प्रकरणात अनिल देशमुख यांचे नाव समोर आल्यापासून ठाकरे सरकार अडचणीत सापडले आहे. विरोधकांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे महाराष्ट्राची प्रतिमा डागाळल्याचे राज ठाकरे यांनी ट्विट करून लिहिले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ राजीनामा द्यावा आणि या प्रकरणाची सखोल उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि ते म्हणाले की, त्यांच्यावरील आरोपांची चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेने केली पाहिजे. परमबीर सिंह यांच्या पत्रात देशमुख यांच्यावर आरोप आहेत. त्या आधारे देशमुखांनी स्वत: राजीनामा द्यावा किंवा उद्धव ठाकरे यांनी त्यांना काढून टाकले पाहिजे.

विशेष म्हणजे महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस एकत्र सरकार चालवत आहेत. दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ही यूपीएची मोट बांधण्यात गुंतले आहेत. त्याचबरोबर गृहमंत्री अनिल देशमुख हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आहेत. अशा परिस्थितीत आघाडीत बिघाडी होते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*