एकीकडे फडणवीसांच्या वक्तव्याची भिजलेला लवंगी फटाका म्हणून खिल्ली; दुसरीकडे सरकार वाचविण्यासाठी ठाकरे – देशमुख भेटी-गाठी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : एकीकडे देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याची भिजलेला लवंगी फटाका म्हणून खिल्ली; दुसरीकडे सरकार वाचविण्याची धावपळ आणि भेटी-गाठी, अशी महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारची आज – कालची अवस्था होती.sanjay raut targets devendra fadanavis; anil deshmukh meet CM uddhav thackeray at varsha; a face saving exercise

शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊतांनी आज पोलीस बदली – पोस्टिंग रॅकेटच्या रश्मी शुक्लांच्या अहवालाला भिजलेला फटाका म्हणत खिल्ली उडविली. त्याच्या आदल्याच दिवशी काल १०० कोटींच्या खंडणीखोरीचा आरोप झालेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. पण या भेटीतले तपशील कोणीही जाहीर केले नाहीत.देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्याऐवजी मौन बाळगणे मुख्यमंत्र्यांनी पसंत केले आहे. पण शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मात्र आम्ही तानाजी मालूसरे, बाजीप्रभूंचे वंशज असल्याचा दावा करीत मीडियाच्या प्रश्नांना आणि फडणवीसांच्या आरोपांना टोलविले आहे.

राऊत म्हणाले, की विरोधी पक्षनेते जो काही बॉम्ब घेऊन आले होते तो भिजलेला लवंगी फटाका आहे. त्या फटाक्याला वातसुद्धा नव्हती. आम्ही दिल्लीत कुठे स्फोट झाला, महाराष्ट्रात काही पडसाद उमटतात का पाहत होतो. पण तसे काही दिसले नाही. बंगालप्रमाणे महाराष्ट्र आणि दिल्लीत ‘खेला होबे’ सुरू आहे. यामुळे लोकांचे चांगले मनोरंजन होत असून त्यासाठी कोणता मनोरंजन टॅक्सही भरायची गरज नाही,’ असा टोला संजय राऊतांनी लगावला.

दिल्लीत महाराष्ट्राच्या नेत्यांनी यायला पाहिजे. दिल्लीवर महाराष्ट्राचा प्रभाव असायलाच हवा आणि त्यादृष्टीने विरोधी पक्षनेते येत असतील तर त्यांचे स्वागत करायला हवे. काहीतरी कागद घेऊन आले आणि गृहसचिवांना भेटले तो कागद काही गंभीर नाही. विरोधी पक्षाच्या हातातील कागद गंभीर आहे की नाही हे सरकार ठरवणार. त्यात सरकारला अडचणीत आणेल असे काही नाही. त्याची काय दखल घ्यायची हे मुख्यमंत्री ठरवतीले, असेही राऊत म्हणाले.

राऊतांनी भले आज खिल्ली उडविली असेल, पण काल सायंकाळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझे यांना १०० कोटींची खंडणी वसूल करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. या आरोपांनंतर पहिल्यांदाच अनिल देशमुख आणि उद्धव ठाकरे यांची वर्षावर प्रत्यक्ष भेट झाली. सुमारे एक तास ही बैठक सुरू होती.

अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीची कोणतीही माहिती जाहीर केली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही याबाबत मौन बाळगले आहे.

sanjay raut targets devendra fadanavis; anil deshmukh meet CM uddhav thackeray at varsha; a face saving exercise

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*