मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत, हे तपासावे; संजय राऊतांचे नाव न घेता अनिल देशमुखांवर ताशेरे!!; पवारांशी बोलून दुरूस्तीचाही दिला इशारा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मनसुख हिरेन – सचिन वाझे – परमवीर सिंग यांचे पत्र या सगळ्या प्रकरणानंतर शिवसेना खासदार संजय राऊतांचे राजकीय भाष्य बदलले असून भाषा कमालीची मवाळ झालेली दिसतेय. एरवी विरोधी भाजपवर अनेकदा अनाठायी वाग्बाण सोडणारे संजय राऊत आता ठाकरे – पवार सरकारमधील मंत्र्यांनाच आत्मपरीक्षणाचा सल्ला देऊ लागलेत, वर दुरूस्तीचाही इशारा देऊन बसलेत. sanjay raut targets anil deshmukh, says, things must be corrected

संजय राऊत म्हणाले, की सचिन वाझे प्रकरण आणि परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे राज्य सरकारवर शिंतोड उडाले आहेत. त्यामुळे आता सरकारमधील मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत का, ते तपासून पाहायला हवे. सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पोलीस खाते हे राज्याचा कणा असतो. स्वाभिमानाचे प्रतिक असते. हा कणा राज्यकर्त्यांनी मजबूत ठेवायचा असतो. सध्याची परिस्थिती पाहता काहीतरी दुरुस्त करावे लागेल.“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायम सरकारची प्रतिमा चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गोष्टी घडल्या. या सगळ्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे होते. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. जगभरात सत्तास्थानी बसल्यावर अनेकांना आपण शहाणे असल्याचे वाटायला लागते, हे या प्रकरणाच्या निमित्ताने दिसून आले. या सगळ्या प्रकरणात शरद पवार योग्य भूमिका आणि निर्णय घेतील. मी आज दिल्लीत जाणार आहे. त्यावेळी शरद पवार यांच्याशी या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करेन,” असे राऊत यांनी सांगितले.

परमवीर सिंगांची स्तुतीच

परमबीर सिंह हे माजी पोलीस आयुक्त होते. ते एक उत्तम अधिकारी आहेत. त्यांनी आतापर्यंत उत्तम सेवा बजावली आहे. मात्र, परमबीर सिंह यांनी पत्रात लिहिलेल्या गोष्टींची सत्यता पडताळावी, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ही सत्यता पडताळून पाहतील, असे सांगून राऊतांनी विरोधी पक्षाच्या मागणीवर सरकार चालत नाही किंवा सरकारमध्ये उलथापालथ होत नाही. मी चहाला उधार नाही, पण या पत्राने सरकारवर शिंतोडे उडवले ही बाब मी मान्य करतो. हे सरकार स्थापन करण्यात खारीचा वाटा उचलणाऱ्या पण सरकारबाहेर असणाऱ्या माझ्यासारख्या हितचिंतकांसाठी ही धक्कादायक गोष्ट आहे,” असेही म्हटले आहे.

sanjay raut targets anil deshmukh, says, things must be corrected

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*