संजय राऊत वाझेंची पाठराखण का करत आहेत? प्रवीण दरेकर यांचा सवाल

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख अंबानी स्फोटक प्रकरणात गंभीर चुका झाल्याचे म्हणत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. तरीही शिवसेनेचे खासदार आणि सामना संपादक संजय राऊत निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंची पाठराखण का करत आहेत, असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.Sanjay Raut following Waze? Question by Praveen Darekar


विशेष प्रतिनिधी 

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख अंबानी स्फोटक प्रकरणात गंभीर चुका झाल्याचे म्हणत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. तरीही शिवसेनेचे खासदार आणि सामना संपादक संजय राऊत निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंची पाठराखण का करत आहेत, असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

दरेकर म्हणाले, ‘सामनामधून संजय राऊत यांनी सर्व काही आलबेल असल्याचे म्हटले आहे. सर्व काही विस्कळलेले असताना आलबेल असल्याची भूमिका मांडली जात आहे. कारण याच प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री जे पोलिस प्रशासनाचे सरकारचे प्रमुख आहेत.त्यांनीच त्या ठिकाणी सांगितले की, काही महत्त्वाच्या चूका झाल्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारची बदली करण्यात आली आहे. दुसºया बाजुला वाझेच्या प्रकरणात काँग्रेस म्हणतेय की, चुक झाली असेल तर कोणताही मोठा अधिकारी असो त्यावर कारवाई झाली पाहिजे.

मग दोन पक्षांची भूमिका अशी असताना संजय राऊत वाझेंची पाठराखण करण्याचा प्रयत्न का करत आहेत? यावरुन संशय येतोय.या ठिकाणी काहीच आलबेल नाही. विसंवादाने भरलेले या तिन्हीही पक्षांमधील वातावरण आहे.

खासकरुन वाझे प्रकरणामध्ये तिन्हीही पक्षांमध्ये विसंवाद आहे असा आरोप करून दरेकर म्हणाले, राज्याच्या गृहमंत्र्यांनीच स्वीकार केले की, महत्वाच्या चुका झाल्या आहेत. म्हणजेच सरकार म्हणूनच चुका झाल्या आहेत.

पण तरीही यांना पाठीशी घालण्याचे काम सुरू असेल तर यांचेच काही साटेलोटे आहेत काय याविषयावर संशय बळावतो. जे पाठीशी घालताय त्यांचच काही तरी या प्रकरणामध्ये साटेलोटे आहे.

Sanjay Raut following Waze? Question by Praveen Darekar

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*