बरोबर आहे… बजेटचा वापर निवडणूक जिंकण्यासाठी करता कामा नये… पण गुंडांसमवेतचा फोटो वापरायला काय हरकत आहे??


विशेष प्रतिनिधी

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पाचा वापर करून भाजपने पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या विधानसभा निवडणूका जिंकता कामा नयेत, असे सामनाकारांनी बजावल्यानंतर केंद्र सरकार बरेच “घाबरल्याचे” दिसते आहे… आता बजेट प्रपोजल ते मागे घेणार की काय अशी भीती त्या राज्यातील नागरिकांना वाटू लागली आहे…!!!sanjay raut dares not to use budget for elections in bengal and tamilnadu

बरोबरच आहे… पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणूका व्हायच्या आहेत. तिथल्या कोलकाता – दार्जिलिंग कॉरिडॉरसाठी बजेटमध्ये २५ हजार कोटींची तरतूद केली आहे. तसाच निधी मदुराई कॉरिडॉरसाठी बजेटमधून देण्यात आला आहे. त्यामुळे सामनाकारांचे पोट दुखले आहे. त्यातून त्यांनी बजेटचा वापर निवडणूकीमध्ये करता कामा नये, असा इशारा केंद्राला देऊन टाकला आहे…

ठीक आहे… बजेटचा वापर निवडणूका जिंकण्यासाठी करता कामा नये… पण गुंड-पुंडासमवेत काढलेल्या फोटोंचा वापर निवडणूका जिंकण्यासाठी करायला काय हरकत आहे… त्याला तर सामनाकार उद्याच्या अग्रलेखातून आक्षेप घेणार नाहीत ना… केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या बजेटचा वापर करून भाजपने बंगाल आणि तामिळनाडूच्या निवडणूका अजिबात जिंकू नयेत…पण महाराष्ट्राच्या ठाकरे – पवार सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी औरंगाबादमध्ये जाऊन तिथल्या गुंड – पुंड बरोबरचा फोटो राष्ट्रवादीने किंबहुना महाविकास आघाडीने प्रचारात वापरून औरंगाबाद महापालिकेच्या निवडणूका जिंकायला काय हरकत आहे…!! बरं… सामनाच्या फोटोग्राफरला पाठवून वेगळा फोटो काढून घ्यायची जरूरत नाही… कलीम कुरेशी, मतीन सय्यद आणि जफर बिल्डर या गुन्हेगारांबरोबरचा गृहमंत्र्यांचा फोटो ऑलरेडी व्हायरल होतोय!! तोच फोटो निवडणूकीच्या प्रचारात वापरून दणका उडवून द्यायचा.

किंबहुना हा लोकशाहीने दिलेला हक्कच आहे… असे समजून “महाराष्ट्राचे गृहमंत्री आपल्या लव औरंगाबादमधील सन्माननीय गुंडांसमवेत” अशा फोटोओळी देऊन त्याची होर्डिंग शहरभर लावून महाविकास आघाडीने औरंगाबादच्या निवडणूका जरूर जिंकाव्यात… गृमंत्र्यांच्या बरोबर फोटोत असलेल्या गुंडांना प्रचारात उतरवावे. त्यांच्या जंगी सभा, रॅल्या घ्याव्यात. यातच महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारच्या विजयाचे श्रेय सामावले आहे, असे समजून प्रचाराचा आत्तापासून दणका उडवून द्यावा… भाजपने मात्र बजेटचा वापर निवडणूक जिंकण्याकरता करता कामा नये… तो त्यांना अधिकार नाही… लोकशाहीने दिलेला तर अजिबात नाही!!

sanjay raut dares not to use budget for elections in bengal and tamilnadu

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी