नाचक्कीचा दिवस तरीही महाविकास आघाडीचे नेते म्हणतात, आमचे “नाक” वर!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई – मनसुख हिरेन – सचिन वाझे प्रकरणात एका पाठोपाठ एक धक्कादायक खुलासे होऊन ठाकरे – पवार सरकारची महाराष्ट्रासह देशात नाचक्की झाली. सरकारने त्याचे राजकीय खापर पोलिसांवर फोडून झाले, तरीही महाविकास आघाडीतले नेते मात्र जणू काही झालेच नाही, अशा थाटात प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. sanjay raut balasaheb thorat tried to save the face of thackeray pawar govt over sachin vaze issue

शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी स्वतःहूनच ट्विट करून काहीही झाले तरी सरकारला धोका नाही. सरकार पडत नाही, असा दावा केला आहे. त्यांनी विरोधकांनाच सुनावले आहे. पण त्यांचा बचाव एकूण घटनाक्रमापुढे तोकडा पडताना दिसतो आहे. संजय राऊत यांनी ट्विट केले आहे, की मुंबई तसेच महाराष्ट्र पोलीस दलास नवे नेतृत्व मिळाले आहे. आपल्या पोलीस दलाची परंपरा महान आहे. एखाद्या वावटळीत पोलीस दलाची पडझड होईल या भ्रमात कोणीच राहू नये. खाकी वर्दीचा मान आणि शान यापुढील काळात अधिक हिमतीने व सचोटीने राखला जाईल हीच अपेक्षा.

राऊतांनी हे ट्विट भाजपला उद्देश्यून केले आहे. तरीही त्यात सचिन वाझे प्रकरणात विरोधकांच्या प्रचंड दबावापुढे झुकून सरकारला पोलिस दलात फेरबदल करावे लागल्याची खंतही दिसते आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील अशाच आशयाची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुंबई पोलिस आयुक्त बदलाची चर्चा झाली नाही. राज्याच्या बाकीच्या विषयांवर चर्चा झाल्याचा दावा थोरात यांनी दुपारी केला. पण सायंकाळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतःच ट्विट करून मुंबई पोलिस आयुक्तांची बदली केल्याची माहिती दिली. त्यामुळे यातून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्येच समन्वय नसल्याचेच दिसून आले.

sanjay raut balasaheb thorat tried to save the face of thackeray pawar govt over sachin vaze issue

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती