संभाजीनगर हे नाव बरोबरच; सरकार मुख्यमंत्र्यांच्या नावाने आणि लोकभावनेवर चालते; राऊतांनी घेतला थोरातांबरोबच अजितदादांशीही पंगा


संभाजीनगरचा उल्लेख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला त्यावर सुरवातीला बाळासाहेब थोरात आणि नंतर अजित पवारांनी घेतला. तरीही उध्दव ठाकरे बधले नाहीत.


विशेष प्रतिनिधी

नाशिक : औरंगाबाद की संभाजीनगर या नामांतराच्या मुद्द्यावरून भाजपने टाकलेल्या पेचातून सुटण्यासाठी शिवसेनेने आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी पंगा घेतला आहे. sanjay raut ajit pawar aurangabad rename latest news

संभाजीनगरचा उल्लेख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला त्यावर सुरवातीला बाळासाहेब थोरात आणि नंतर अजित पवारांनी घेतला. तरीही उध्दव ठाकरे बधले नाहीत. त्यांनी एकूण तीनदा सीएमओच्या ट्विटर हॅंडलवरून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच केला. आता खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये येऊन मुख्यमंत्र्यांच्या संभाजीनगरच्या उल्लेखाचे समर्थन केले आहे. ते म्हणालेत, की “सरकार हे मुख्यमंत्र्यांच्या नावाने, लोकभावनेवर चालते. मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली ती योग्य आहे.सरकार हे मुख्यमंत्र्यांच्या नावाने चालते आणि सरकारने संभाजी महाराजांचे नाव वापरणे हा गुन्हा आहे का? छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे यांची नावे सरकारी कागदपत्रांवर किंवा ट्विटरवर वापरणे हा गुन्हा आहे असे मला वाटत नाही, शेवटी सरकार हे लोकभावनेवर चालते.”

sanjay raut ajit pawar aurangabad rename latest news

याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेने सरकारी यंत्रणेचा असा उपयोग करू नये, काय लिहायचे असेल ते सामनामध्ये लिहावे असे म्हटले होते. बाळासाहेब थोरात यांनी देखील अजित पवारांच्या आधी तीच भूमिका मांडली होती. तरीही उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन करणे सोडलेले नाही.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती