जळगावात शिवसेनेकडून “सांगली पॅटर्न”; राज्यात फडणवीसांची धुवाँधार बॅटिंग, पण स्वतःच्या विकेट टिकविण्यात चंद्रकांतदादा आणि गिरीश महाजन अपयशी


  • नेते दुखावले तरी खालची फळी ताब्यात ठेवावी लागते, हा भाजपसाठी धडा

विशेष प्रतिनिधी

जळगाव : सांगलीत जयंत पाटलांनी पॅटर्न घडविला. जळगावात शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून पॅटर्न घडवत आहेत. पण एकूण भाजपसाठी हा “वरून” नेते दुखावले, तरी खालची फळी ताब्यात ठेवावी लागते आणि ती ताब्यात ठेवण्यात अपय़श आले आहे, हा महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांसाठी धड़ा आहे. sangli pattern in jalgaon, after chandrakant patil girish mahajan failed to retain bjp power in muncipal corporation

महाराष्ट्राच्या विधानसभेत नुसती देवेंद्र फडणवीसांनी बॅटिंग करून षटकार ठोकून मॅच जिंकता येत नाही… चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांनाही दमदार बॅटिंग करून विकेट टिकवावी लागते, हे दाखवून देणारा हा धडा आहे. पण आपली विकेट टिकविण्यात हे दोन्ही नेते अपयशी ठरले आहेत.

शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांनी जोरदार सर्जिकल स्ट्राईक करून भाजपचे ३० नगरसेवक आपल्या तंबूत आणले आहेत. पण, आता भाजपला आणखी एक धक्का बसला असून आणखी एक गट शिवसेनेत दाखल झाला आहे.जळगाव महापालिकेत आज सकाळी ११ वाजता ऑनलाइन पद्धतीने महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होत आहे. भाजपचा एक गट हा निवडणूक अगोदरच शिवसेनेला जाऊन मिळाला आहे. त्यामुळे आज जळगावात सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून महापौरपदासाठी जयश्री महाजन तर भाजप मधील बंडखोर उमेदवार उपमहापौरपदासाठी कुलभूषण पाटील यांचे नाव निश्चित केले आहे.

जळगावमध्ये एकनाथ खडसेंना भाजपने दुखावले. पण नगरसेवक नियंत्रणात ठेवण्यात गिरीश महाजनांना अपयश आले. सत्तेत असलेल्या भाजपला हादरा देत शिवसेना आणि राष्ट्रवादीने ५७ पैकी तब्बल ३० नगरसेवक सेनेत दाखल झाले आहेत. महापौरपदाच्या निवडणुकीत पराभव होण्याच्या भीतीने भाजपने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. शिवसेनेच्या तंबूत गेलेल्या फुटीर नगरसेवकांना व्हीप न बजावता आल्याने भाजपाने कोर्टात याचिका दाखल केली आणि महासभा ऑनलाइन नाही तर ऑफलाइन घेतली तर व्हीप बजावता येईल, अशी भूमिका मांडली. परंतु,औरंगाबाद खंडपीठाने भाजपची याचिका फेटाळून लावली आहे. कोरोना परिस्थिमुळे निवडणूक ऑनलाइन घेण्यासाठी कोर्टाने आदेश दिले आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

sangli pattern in jalgaon, after chandrakant patil girish mahajan failed to retain bjp power in muncipal corporation

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती