संबित पात्रा यांचा राजदीप सरदेसाई यांच्यावर हल्लाबोल


एक पत्रकार खोट्या बातम्या पसरवित आहे. टीव्हीवर अँकरिंग करताना आणि ट्विटरवरही फेक न्यूज पसरवित आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी राजदीप सरदेसाई यांच्यावर हल्लाबोल केला.


प्रतिनिधी

नवी दिल्ली : एक पत्रकार खोट्या बातम्या पसरवित आहे. टीव्हीवर अँकरिंग करताना आणि ट्विटरवरही फेक न्यूज पसरवित आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी राजदीप सरदेसाई यांच्यावर हल्लाबोल केला.Sambit Patra’s attack on Rajdeep Sardesai

इंडिया टूडेच्याच आज तक या वाहिनीवर बोलताना संबित पात्रा यांनी अशा पत्रकारांना नेम अँड शेम करायला हवे, अशी मागणी केली. प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे ट्रॅक्टर परेडच्या वेळी ट्रॅक्टर उलटून एकाचा मृत्यू झाला होता.मात्र, राजदीप सरदेसाई यांनी पोलीसांच्या गोळीने शेतकऱ्याचा मृत्यू झाला, अशी बातमी दिली. त्यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरही ही बातमी टाकली. मात्र, नंतर राजदीप सरदेसाई यांची ही बातमी खोटी असल्याचे उघड झाले.

ट्रॅक्टर रॅलीच्या दरम्यान आंदोलक शेतकऱ्यांचा एक ग्रुप बॅरिकेटींग तोडून नियोजित मार्ग सोडून निघाला होता. लाल किल्याकडे जाताना झालेल्या गोंधळात ट्रॅक्टर उलटून त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला.
याबाबत बोलताना संबित पात्रा म्हणाले की, एक पत्रकार गेल्या काही दिवसांपासून फेक न्यूज पसरवित आहे. आपल्याला माहित आहे की हा कोण आहे. हा पत्रकार टीव्हीवर आणि ट्विटरवरही या फेक न्यूज पसरवित आहे. त्याची फेक न्यूज कॉंग्रेसनेही पसरविली. मात्र, सत्य समोर आल्यावर दोघेही उघडे पडले. मी त्या पत्रकाराचे नाव घेणार नाही.

या पत्रकाराने म्हटले होते की या शेतकऱ्याचा मृत्यू व्यर्थ जाणार नाही. त्याचा बदला घेतला जाईल. पोलीसांच्या समोर उभे राहून अशा खोट्या बातम्या पसरविल्या तर कसे चालेल? खोटारडेपणा करणाऱ्या पत्रकारांना नेम अ‍ॅंड शेम करायला हवे.

Sambit Patra’s attack on Rajdeep Sardesai

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती