कोरोना लस काय भाजपा मुख्यालयात घोटून बनविली आहे? संबित पात्रा यांचा समाजवादी पक्षाच्या नेत्यांना सवाल

कोरोनावरील लस काय भाजपाच्या मुख्यालयात घोटून बनविली आहे का? असा सवाल करत ही लस भाजपाची मानत असाल तर देशातील हवा, पाणीही भाजपचे आहे का? तुम्ही पानं गुंडाळून जंगलात राहायला जा, असा सल्ला भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी समाजवादी पक्षाच्या नेत्यांना दिला आहे. Sambit Patra question to Samajwadi Party leaders over corona vaccine


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनावरील लस काय भाजपाच्या मुख्यालयात घोटून बनविली आहे का? असा सवाल करत ही लस भाजपाची मानत असाल तर देशातील हवा, पाणीही भाजपचे आहे का? तुम्ही पाने गुंडाळून जंगलात राहायला जा, असा सल्ला भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी समाजवादी पक्षाच्या नेत्यांना दिला आहे.

समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी भाजपाची लस आपण घेणार नाही असे म्हटले होते. याला उत्तर देताना पात्रा म्हणाले, आमचे सरकार आहे म्हणून लसही आमची झाली का? याच न्यायाने मग येथील हवा, पाणीही भाजपाचे झाले. तुम्ही त्याचाही वापर करू नका. पानं गुंडाळून जंगलात जा आणि गुहेमध्ये जाऊन राहा.पात्रा म्हणाले की, गेल्या वर्षभरात जगभरात अनेकांचा मृत्यू झाला. आम्हाला शास्त्रज्ञांचा अभिमान वाटला पाहिजे. एक वर्षाच्या आत त्यांनी कोरोनावर लसीचा शोध लावला. देशात अगदी हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या काही देशांनाच कोरोनावरील लसीचा शोध लावता आला आहे. इंग्लंडसह अनेक देशांनी भारताकडे लसीसाठी मागणी केली आहे. कारण त्यांना भारतावर विश्वास आहे. पण आपल्याकडील काही नेत्यांचाच भारतीय शास्त्रज्ञांवर विश्वास नाही.

Sambit Patra question to Samajwadi Party leaders over corona vaccine

ही लस काय भाजपा मुख्यालयात घोटून बनविली आहे का? असा सवाल करून पात्रा म्हणाले ही दोन मुले पंक्चर झालेल्या सायकलवर बसलेले आहेत. त्यातील एक येथे आहे तर दुसरा परदेशात आहे. मात्र, दोघांची मानसिक अवस्था सारखीच आहे. त्यामुळेच हे म्हणत आहेत की ही भाजपाची लस आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*