सचिनने भारताची बाजू घेत प्रतुत्तर दिले रिहाना आणि ग्रेटाला, ते टोचले संभाजी ब्रिगेड आणि केरळमधल्या डाव्यांना!!

  • सचिन तेंडूलकरला प्रदान केलेला भारतरत्न किताब मागे घेण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सचिनने देशाची बाजू घेत प्रतुत्तर दिले रिहाना आणि ग्रेटाला, ते टोचले संभाजी ब्रिगेड आणि केरळमधल्या डाव्यांना!!, अशी आजची अवस्था आहे.sambhaji brigead demands to take back bharat ratna from sachin tendulkar

शेतकरी आंदोलनावरून देशाच्या बाजूने ट्विट करणाऱ्या क्रिकेटस्टार सचिन तेंडूलकर विरोधात काही संघटनांनी ट्रेंड सुरू केला आहे. यात संभाजी ब्रिगेड आणि केरळमधील डाव्या पक्षांच्या केडरची भर पडली असून त्याला प्रदान केलेला भारतरत्न किताब मागे घ्यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

इंडिया टुगेदर हॅशटॅग चालवून सचिनसह अनेक सेलिब्रिट्रींनी भारतविरोधी आंतरराष्ट्रीय कारस्थानाला खणखणीत प्रत्युत्तर दिले होते. त्याचा विरोध करत संभाजी ब्रिगेडने सचिनला शेतकरी विरोधी ठरवत त्याला दिलेला भारतरत्न किताब काढून घेण्याची मागणी केली आहे.तर दुसरीकडे हजारो डाव्या पक्षांचे सरकार असलेल्या केरळींनी रशियन टेनिस स्टार मारिया शारापोवा नाट्यमय माफी मागून सचिन तेंडूलकरला टीकेचे लक्ष्य केले आहे. मारिया शारापोवाने कधीकाळी मी सचिनला ओळखत नाही, असे म्हटले होते. त्यावेळी करोडो भारतीयांनी तिच्यावर टीकास्त्र सोडले होते.

पण शेतकरी आंदोलनावरून राजकारण सुरू असताना त्यात सचिनला टार्गेट करण्यासाठी डाव्या पक्षांचे समर्थक केरळींनी शारापोवाची नाट्यमय माफी मागितली आहे. मारिया तू बरोबर होतीस. आम्ही सचिनला ओळखू शकलो नाही, असे मल्याळी भाषेतले हजारो ट्विटस मारिया शारापोवाला उद्देश्यून करण्यात आले आहेत.

शेतकरी आंदोलनावर आंतरराष्ट्रीय पातळीवरील सेलिब्रिटींना खणखणीत प्रत्युत्तर दिल्याने सचिन आणि अन्य भारतीय सेलिब्रिटींना आता विरोधी पक्ष टार्गेट करीत आहेत. अजित पवारांनी देखील भारतीय सेलिब्रिटींना झापल्याची बातमी मराठी माध्यमांनी दिली आहे.

sambhaji brigead demands to take back bharat ratna from sachin tendulkar

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*