शिर्डीत साईभक्तांना बुंदीचे लाडू पाकिटांची विक्री आजपासून सुरु

वृत्तसंस्था

शिर्डी : साईबाबांच्या भाविकांना श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांच्याकडून बुंदीचे लाडू पाकिटांची 20 मार्चपासून विक्री करण्यात येणार आहे. गेट नंबर 4 आणि हनुमान मंदिरा शेजारील साई कॉम्प्लेक्स येथे लाडू विक्री काऊंटर सुरू केल्याची माहिती श्री साईबाबा देवस्थानने दिली. Sales of Bundi laddu packets to Sai devotees in Shirdi start from today

कोरोनाच्या संकटामुळे 17 मार्च 2020 पासून शिर्डी साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद केले होते. त्यामुळे सशुल्क लाडू प्रसाद पाकीट विक्री पूर्णता बंद केली होती. राज्य शासनाच्या आदेशानुसार 16 नोव्हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटींवर खुले केले आहे. तसेच कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून लाडू प्रसाद उत्पादन पुन्हा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले आहे.6 मार्च 2021 पासून श्रींच्या दर्शनासाठी भक्तांना दर्शन झाल्यानंतर दर्शन रांगेत अंदाजे 50 ग्रॅम वजनाचा एक बुंदी लाडू प्रसाद रूपाने पाकिटातून विनामूल्य देणार आहे. साई भक्तांकडून होत असलेल्या मागणीनुसार 20 मार्चपासून लाडू प्रसाद विक्री सुरू करण्यात येणार आहे. तीन लाडू असलेल्या पाकीटा साठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर 25 रुपयांप्रमाणे विक्री केली जाणार आहे.

Sales of Bundi laddu packets to Sai devotees in Shirdi start from today

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*