क़डव्या सादिया शेखचे ‘डिरॅडीकलायझेशन’ झालेच नाही, पुन्हा इसीससाठी काम, तरुणांना जाळ्यात ओढण्याचे काम


अवघ्या सोळा वर्षांची अल्पवयीन मुलगी इसीसच्या तत्वज्ञानाने भारावून जाऊन दहशतवाद्यांची सहानुभूतीदार बनली. पुढे ती जम्मू-काश्मीरमध्ये शिकण्यासाठी गेली. नंतर पुण्यात येऊन रितसर पत्रकार परिषद घेऊन आपण दहशतवादापासून दूर गेल्याचे सांगते. पोलीसांनाही वाटते की समुपदेशनातून आपण तिचे मतपरिवर्तन केले. पण हीच सादिया शेख इसीससाठी नवीन तरुणांना जाळ्यात ओढण्याचे काम करत असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेला आढळून आले.


विशेष प्रतिनिधी

पुणे : अवघ्या सोळा वर्षांची अल्पवयीन मुलगी इसीसच्या तत्वाज्ञानाने भारावून जाऊन दहशतवाद्यांची सहानुभूतीदार बनली. पुढे ती जम्मू-काश्मीरमध्ये शिकण्यासाठी गेली. नंतर पुण्यात येऊन रितसर पत्रकार परिषद घेऊन आपण दहशतवादापासून दूर गेल्याचे सांगते. पोलीसांनाही वाटते की समुपदेशनातून आपण तिचे मतपरिवर्तन केले. पण हीच सादिया शेख इसीससाठी नवीन तरुणांना जाळ्यात ओढण्याचे काम करत असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेला आढळून आले आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) रविवारी पहाटे सादिया शेख ही तरुणी आणि नबील खत्री या तरुणाला पुण्यातून ताब्यात घेतले. त्यांच्यावर इसीस (इस्लामिक स्टेट) या दहशतवादी संघटनेसाठी काम करायचे आरोप आहे.

एनआयए आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकांनी दिल्लीतील जामिया नगर परिसरातून इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन मार्च महिन्यात एका काश्मीरी डॉक्टर दांपत्याला ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत नबील खत्री आणि सादिया शेख यांचे नाव पुढे आले. त्यानंतर एनआयएने या दोघांवर नजर ठेवली होती. ते पुण्यात स्लिपर सेल म्हणून काम करत असल्याचे त्यांच्या तपासात दिसून आल्यावर दिल्लीतून एनआयएचे पथक थेट पुण्यात येऊन धडकले. दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

याबाबत पुणे एटीएसचे तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी सांगितले की, गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीनुसार आपण २०१५ मध्ये सादिया शेख हिच्यावर नजर ठेवली होती. त्यात ती इसिसच्या संपर्कात असल्याचे इंटरनेटवरील पडताळणीवरुन लक्षात आले होते. त्यानंतर तिचे आपण अनेक दिवस समुपदेशन केले. त्यासाठी त्यांच्या समुदायातील मौलवींची मोठी मदत झाली होती.

यावेळी तिच्या वागणूकीत व पेहरावामध्येही बदल झाल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले होते. त्यानंतर तिच्या आईसमोर तिने आपण आता त्यांच्या संपर्कात राहणार नसल्याचे सांगितले होते.  त्यानंतर एटीएसमधून आपली बदली झाल्यानंतर पुढे २०१८ मध्ये तिला काश्मीरमध्ये पकडण्यात आले होते. त्याचा तपास एनआयए करीत असल्याने त्याची माहिती आम्हाला मिळू शकली नाही.

२०१८ मधील काश्मीर प्रकरणात पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते अंजुम इनामदार यांच्या पुढाकाराने सादिया व तिच्या आईने पत्रकार परिषद घेतली होती. अंजुम इनामदार यांनी सांगितले की, त्यांनी आमच्याशी संपर्क साधला होता. या मुलीवर पोलिसांची सतत पाळत होती. तिच्या कॉलेजमध्ये जाऊनही पोलीस चौकशी करीत असतात. त्यामुळे पुण्याला आपण वैतागलो असल्याचे तिने व तिच्या आईने सांगितले होते. त्यासाठी शिक्षणासाठी तिला काश्मीरला पाठविण्यात आले होते, असा खुलासा त्यावेळी तिने केला होता.

या प्रकरणानंतर गेल्या २ वर्षात आपला तिचा अथवा तिच्या आईशी काहीही संपर्क झालेला नाही. यापूर्वी देशातील सर्व तपास यंत्रणांनी तिच्याकडे चौकशी केली आहे. पण, तिच्यावर आतापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. एनआयएने तिच्यावर कारवाई केल्याची माहिती मिळाली. पण, सध्या आपला तिच्याशी संपर्क नसल्याचे इनामदार यांनी सांगितले.

२०१८ मध्ये पुण्यातील एक तरुणी काश्मीरमध्ये मानवी सुसाईड बॉम्बर म्हणून आल्याची खबर गुप्तचर विभागाने दिली होती. २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर ही खबर आल्याने संपूर्ण काश्मीरमध्ये अलर्ट देण्यात आला होता. हे वाचून आपण स्वत: जम्मू काश्मीर पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनी आपल्याकडे चौकशी केल्यानंतर सोडून दिल्याचे सादिया शेख हिने त्यावेळी सांगितले होते. त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला असताना आता २ वषार्नंतर पुन्हा एका प्रकरणात तिचे नाव पुढे आले आहे. सादियाचे मतपरिवर्तन होऊन ती डीरॅडीकलाईज झाली नाही, तर आपले काम करतच होती असे दिसून आले आहे.

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था