Sadhguru suggests solution to temple dilapidation in Tamil Nadu, defines secularism, calls for handing over management of temples to devotees

तामिळनाडूतील मंदिरांच्या दुरवस्थेवर सदगुरूंनी सुचवला उपाय, धर्मनिरपेक्षतेची व्याख्या सांगत मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांना सोपवण्याचे आवाहन

सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी तामिळनाडूमधील मंदिरांची दुर्दशा जगजाहीर करून त्यांचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती देण्याचे आवाहन केले आहे. तामिळनाडू सरकारच्या प्रतिज्ञापत्राचा संदर्भ देताना त्यांनी धर्मनिरपेक्षतेची व्याख्या समजावून सांगितली. यासोबतच त्यांनी मंदिरांची देखभाल भक्तांना सोपवण्याचे म्हटले आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या मंदिरांवर कब्जा करण्याच्या मानसिकतेची आठवणही त्यांनी करून दिली. Sadhguru suggests solution to temple dilapidation in Tamil Nadu, defines secularism, calls for handing over management of temples to devotees


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी तामिळनाडूमधील मंदिरांची दुर्दशा जगजाहीर करून त्यांचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती देण्याचे आवाहन केले आहे. तामिळनाडू सरकारच्या प्रतिज्ञापत्राचा संदर्भ देताना त्यांनी धर्मनिरपेक्षतेची व्याख्या समजावून सांगितली. यासोबतच त्यांनी मंदिरांची देखभाल भक्तांना सोपवण्याचे म्हटले आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या मंदिरांवर कब्जा करण्याच्या मानसिकतेची आठवणही त्यांनी करून दिली. सदगुरू म्हणाले की, हिंदू धार्मिक स्थळांवर अजूनही भेदभाव केला जात आहे. अशा परिस्थितीत जेव्हा मंदिरांचे व्यवस्थापन सामान्य लोकांच्या हाती येईल, तेव्हा या पवित्र ठिकाणांचे भविष्य केवळ सुरक्षितच होणार नाही, तर धर्मनिरपेक्षता खऱ्या अर्थाने साकार होईल.

तमिळनाडूतील मंदिरांची दुर्दशा

आपल्या ट्वीटद्वारे शेअर केलेल्या संदेशात जग्गी वासुदेव असे म्हणतात की, पूर्वीची मंदिरे प्राचीन भारतात बांधली गेली होती. मग त्याभोवती शहरे वसली गेली. या कारणास्तव शहरांना टेंपल टाऊन असे म्हणत. ब्रिटिशांच्या अंमलातील ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय मंदिरांच्या भरभराटीच्या लोभापायी त्यांचे व्यवस्थापन ताब्यात घेतले. आजही तामिळनाडूतील हजारो मंदिरांची अवस्था दयनीय आहे.

ते म्हणाले की, अशी 11,999 मंदिरे आहेत जिथे एकवेळची पूजाही होत नाही. अशी 34 हजार मंदिरे आहेत ज्यांचे वार्षिक उत्पन्न 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. 37 हजार मंदिरांत नियमितपणे पूजा करण्यासाठी एकच माणूस आहे. अशा परिस्थितीत मंदिरांची देखभाल, सुरक्षा आदी व्यवस्था कशा प्रकारे होऊ शकते? असा सवालही त्यांनी केला.तरच धर्मनिरपेक्षता साकार होईल

धर्मनिरपेक्षतेची व्याख्या सांगताना सद्गुरू म्हणतात की, धर्मनिरपेक्षतेचा अर्थ असा आहे की सरकारने धर्मातील प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करू नये आणि धर्मानेही सरकारच्या आड येऊ नये. हे व्यक्त करताना सद्गुरू म्हणतात की, हीच योग्य वेळ आहे मंदिरे सरकारी यंत्रणेच्या ताब्यातून सोडवून भक्तांच्या हातात दिली जावीत. सद्गुरू ईशा फाऊंडेशनचे संस्थापक आहेत. ईशा फाउंडेशन युनायटेड स्टेट्स, इंग्लंड, लेबेनॉन, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियासह भारतात योग शिकवते. असंख्य सामाजिक विकास योजनांवरही सदगुरूंनी कार्य केलेले आहे. युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कौन्सिल (ईसीओएसओसी) मध्ये त्यांना विशेष सल्लागार म्हणून पद मिळाले आहे. त्यांनी 8 भाषांमध्ये 100 हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. 2017 मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला होता.

Sadhguru suggests solution to temple dilapidation in Tamil Nadu, defines secularism, calls for handing over management of temples to devotees

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*