सदगुरू जग्गी वासुदेव म्हणाले, जर विमानतळे, उद्योग-व्यापार सरकारच्या नियंत्रणात नाहीत, तर मग फक्त हिंदू मंदिरे कशी?

Sadguru Jaggi Vasudev video viral on government Control Over Hindu temples

देशातील मंदिरांवर सरकारचे नियंत्रण हा कैक वर्षांपासून चर्चेत असलेला विषय आहे. यावर सद्गुरू जग्गी वासुदेव यांचा एक व्हिडिओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. सीएनएन वृत्तवाहिनीच्या आनंद नरसिम्हन यांच्याशी चर्चा करतानाचा व्हिडिओ सद्गुरूंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. Sadhguru Jaggi Vasudev video viral on government Control Over Hindu temples


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील मंदिरांवर सरकारचे नियंत्रण हा कैक वर्षांपासून चर्चेत असलेला विषय आहे. यावर सद्गुरू जग्गी वासुदेव यांचा एक व्हिडिओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. सीएनएन वृत्तवाहिनीच्या आनंद नरसिम्हन यांच्याशी चर्चा करतानाचा व्हिडिओ सद्गुरूंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. यात सदगुरू म्हणतात की, “आपण अशा काळात राहत आहोत जेथे आपण हे मान्य करतो की, सरकारचे एअरलाइन्स, एअरपोर्ट, उद्योग, खाण, व्यापारावर नियंत्रण असू नये, पण मग पवित्र मंदिरांचे व्यवस्थापन शासनाद्वारे कसे करता येईल? यामागे काय तर्क आहे?”

सदगुरू या नावाने प्रसिद्ध असलेल्या जग्गी वासुदेव यांच्या ताज्या मुलाखतीचा एक भाग व्हायरल झाला आहे. देवळांना शासकीय नियंत्रणापासून मुक्त कसे करावे, याविषयी सद्गुरूंनी एका मुलाखतीदरम्यान युक्तिवाद केला. त्यांच्या या युक्तिवादाचे कौतुक केले जात असून विविध क्षेत्रांतील लोक सद्गुरूंच्या विचारांचे समर्थन करत आहेत. यामुळेच सद्गुरू ट्विटरवर अव्वल ट्रेंडवर आले आहेत.वास्तविक, सदगुरूंनी मंदिरांवरील सरकारी नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करताना म्हटले आहे की, आजच्या काळात आम्हाला सर्व सेवा सरकारी नियंत्रणातून मुक्त करायच्या आहेत, परंतु मंदिरांचे व्यवस्थापन शासनाच्या हातात ठेवावेसे वाटते, हे समजण्यासारखे नाही. ते म्हणाले, “आम्ही अशा काळात जगत आहोत जेव्हा आम्हाला असे वाटते की सरकारने विमान कंपन्या, विमानतळ, उद्योग, खाणकाम, व्यापार इत्यादींवरील नियंत्रण हटवावे. परंतु पवित्र मंदिरांवर शासनाचे नियंत्रण कसे असू शकते? यामागे काय तर्क असू शकतो?”

काय म्हणाले सदगुरू?

सद्गुरु जग्गी म्हणाले, “सध्या 37,000 मंदिरांवर सरकारी नियंत्रण आहे. केवळ एकाच समुदायाची मंदिरे शासनाच्या नियंत्रणात आहेत. असा प्रकार इतर कोणत्याही देशात पाहायला मिळणार नाही. हिंदू मंदिरांविषयी बोलताना लोक वारंवार म्हणतात की चर्च, गुरुद्वारा आणि मशिदींवरही नियंत्रण ठेवले पाहिजे. मी असे म्हणतो की, धर्मनिरपेक्ष देशातील सरकारने कोणत्याही धर्माची पर्वा न करता मंदिरात किंवा धार्मिक ठिकाणी हस्तक्षेपापासून दूर राहावे.”

“महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेथे एवढे सगळे लोक श्रद्धेने जातात, ती स्थळे स्वतंत्र असली पाहिजेत. त्यांच्या मानवाधिकारांसाठी हे झाले पाहिजे. आता काही जण युक्तिवाद करतात की पूर्वी मंदिरे राजाच्या नियंत्रणात होती, म्हणून आताही सरकारच्या नियंत्रणात असली पाहिजेत. परंतु हे सत्य नाही. राजे श्रद्धावान होते. काही ठिकाणी ते एवढे भाविक होते की, बऱ्याच साम्राज्यांत ईश्वरालाच राजा मानले गेले. आणि राजाने तेथे देवतांचा दिवाण म्हणून काम केले. याचा अर्थ त्यांनी फक्त देवतेच्या नावावर प्रतिनिधी म्हणून राज्य केले.”सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या मंदिरांच्या पेचप्रसंगाचा संदर्भ देताना सद्गुरू म्हणतात, “हे विशेषतः दक्षिण भारतीय राज्यांमध्ये आहे. विशेषतः तामिळनाडूची मंदिरे अतिशय सुंदरपणे बांधली गेली आहेत. त्यांची इंजिनिअरिंग आणि त्यांचे आर्किटेक्चर… त्यांनी हजार-बाराशे वर्षांपूर्वी केलेले बांधकाम पाहिले तर मंत्रमुग्ध व्हायला होते. पण नंतर हे सर्व चोरी झाले. सर्व काही बरबाद झाले, कारण लोकांच्या मंदिरांविषयीच्या भावना तितक्या प्रबळ राहिल्या नाहीत. तामिळनाडू राज्यात ही मंदिरे आणि श्रद्धा पूर्णपणे नियंत्रणात आहेत. जर तुम्ही नवीन मंदिर बांधेल आणि ते प्रसिद्ध झाले तर सरकारकडून ताबडतोब ते टेकओव्हर करण्याची नोटीस येते. सद्गुरूंनी प्रश्न केलाय की, धर्मनिरपेक्ष देशात हे कसे घडू शकते?

सद्गुरू म्हणाले की, देशातील हिंदू मंदिरांवर सरकारच्या नियंत्रणाविरोधात जनभावना जोर धरत आहेत. सरकारने हिंदूंशी भेदभाव केल्याचा आरोप करत सरकारने मंदिरांवरील आपले नियंत्रण मागे घ्यावे, अशी लोकांची मागणी आहे. ते म्हणतात की, इतर कोणत्याही धर्माच्या उपासना किंवा प्रार्थनास्थळांवर शासनाचे नियंत्रण नसल्यास फक्त हिंदूंची मंदिरे का? या वादाच्या दरम्यान सद्गुरूंची मुलाखत व्हायरल झाली आहे.

फक्त हिंदू मंदिरेच सरकारच्या नियंत्रणात कशी आली….

या व्हिडिओमध्ये, सद्गुरू ईस्ट इंडियाने आणलेल्या ‘मद्रास रेग्युलेशन 1817’चा उल्लेख करत सांगितले की कशा प्रकारे मद्रास रेग्युलेशन-111, 1817 आणण्यात आला. परंतु ईस्ट इंडिया कंपनीने 1840 मध्येच हा नियम मागे घेतला. त्यानंतर 1863 मध्ये रिलिजियस एंडोव्हमेंट कायदा लागू झाला, त्यानुसार मंदिरे ब्रिटिश विश्वस्तांकडे सोपवण्यात आली.

हे विश्वस्तच मंदिर चालवत असत, परंतु यात सरकारचा हस्तक्षेप कमी होता. मंदिरातील पैसे बहुतांश मंदिराच्या कामांसाठी वापरले जात असत. या कायद्यानुसार शेकडो मंदिरे चालत होती. जग्गी वासुदेव म्हणतात की, ब्रिटिश सरकारने नंतर ‘द मद्रास रिलीजियस अँड चॅरिटेबल एंडोव्हमेंट अ‍ॅक्ट -1925’ आणला ज्यामुळे आता हिंदू तसेच मुस्लिम व ख्रिश्चन संस्था या कायद्याच्या कक्षेत आल्या. ख्रिस्ती व मुस्लिमांनी याचा तीव्र विरोध केल्याने सरकारला हा कायदा दुसऱ्यांदा आणावा लागला.

विरोधामुळे ख्रिश्चन आणि मुस्लिमांना यातून वगळण्यासाठी नवा कायदा आणण्यात आला ज्याचे नाव होते – मद्रास हिंदू रिलिजियस अँड एंडोव्हमेंट अ‍ॅक्ट-1927. नंतर 1935 मध्ये या कायद्यात मोठे बदल करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर, तामिळनाडू सरकारने 1951 मध्ये एक नवा कायदा आणला.

Sadhguru Jaggi Vasudev video viral on government Control Over Hindu temples

या कायद्याला विरोध झाल्यानंतर मद्रास उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातात मठ आणि मंदिरांनी धाव घेतली. यानंतर सरकारने यातील अनेक कलमे हटवत 1959 मध्ये तत्कालीन कॉंग्रेस राज्य सरकारने हिंदू रिलिजियस व चॅरिटेबल कायदा मंजूर केला आणि बोर्ड विसर्जित केले गेले. आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आता ‘हिंदू रिलिजियस व चॅरिटेबल एंडोव्हमेंट’ असा एक सरकारी विभाग होता. तेव्हापासून मंदिरांमध्ये येणाऱ्या दानापैकी 65 ते 70 टक्के प्रशासकीय कामांवर खर्च होते.

Sadguru Jaggi Vasudev video viral on government Control Over Hindu temples

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती