ठाकरे सरकारच्या खांद्यावर सचिन वाझेंचे ओझे : अमृता फडणवीस यांचे ठाकरे सरकारवर आरोप ; वाझे प्रकरणात पहिल्यांदाच ट्विटर वर प्रतिक्रिया

विशेष प्रतिनिधी

मुंबई: अंबानींच्या घराजवळ स्फोटकं सापडली. या गंभीर घटनेचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला. त्यानंतर सचिन वाझे यांच्या बाबतीत खळबळजनक माहिती समोर आली. यामुळे ठाकरे सरकारवर सर्वच स्तरावर टीकेची झोड उठली आहे. सचिन वाझेंची पाठराखण केल्याने ‘ ठाकरे सरकारच्या खांद्यावर सचिन वाझेंचे ओझे ‘ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता विरोधी पक्षनेते नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या प्रकरणावरून ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. Sachin Waze’s burden on Thackeray’s shoulders: Amrita Fadnavis’s allegations against Thackeray’s government

सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी पहिल्यांदाच संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे. अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारकडून कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोप यासह उद्योगपतींना धमकावण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप केला आहे.

“एकीकडे नागपूरसारख्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्णांना भरती करण्यासाठी बेड उपलब्ध नाहीत.तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार कोविड सेंटरमधून भ्रष्टाचार करत आहे आणि उद्योगपतींना भीती दाखवून त्यांच्याकडून वसुली करण्याची योजना आपल्याच काही हस्तकांसोबत बनवत आहे,” असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.दुसरीकडे वाझे प्रकरणावरून भाजपानं पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. “चौकशी होऊ द्या मगच वाझेंवर कारवाई करू अशीच तुमची भूमिका होती. अचानक वर्षा या तुमच्या अधिकृत निवासस्थानी मध्यरात्रीपर्यंत गृहमंत्र्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत काय खलबंत सुरू झाली आहेत, मुख्यमंत्री साहेब?,” असं म्हणत भाजपाने सध्या सुरू असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या बैठकांबद्दल सवाल उपस्थित केला आहे.

Sachin Waze’s burden on Thackeray’s shoulders: Amrita Fadnavis’s allegations against Thackeray’s government

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*