सचिन सावंत अर्धसत्य बोलून फसले , सचिन वाझेंनी धुळ्यातून विकत घेतली मर्सिडिझ कार

प्रत्येकच मुद्यावर ट्विट करण्याची सवय असणारे कॉँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत सचिन वाझे यांच्या मर्सिडिझ कारमुळे मात्र चांगलेच अडचणीत सापडले आहे. पोलीसांनी पकडलेल्या मर्सिडिझ कारसोबत भाजपा पदाधिकाºयाचा फोटो दिसल्यावर नाचत नाचतच त्यांनी यामध्ये भाजपाचे कनेक्शन आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, ही कार सेकंड हॅँड असून सचिन वाझे यांनी ऑन लाईन पोर्टलवरून धुळ्यातून विकत घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.Sachin Sawant was caught telling half-truths, Sachin Waze bought a Mercedes car from Dhule


विशेष प्रतिनिधी

मुंबई : प्रत्येकच मुद्यावर ट्विट करण्याची सवय असणारे कॉँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत सचिन वाझे यांच्या मर्सिडिझ कारमुळे मात्र चांगलेच अडचणीत सापडले आहे. पोलीसांनी पकडलेल्या मर्सिडिझ कारसोबत भाजपा पदाधिकाऱ्याचा फोटो दिसल्यावर नाचत नाचतच त्यांनी यामध्ये भाजपाचे कनेक्शन आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, ही कार सेकंड हॅँड असून सचिन वाझे यांनी ऑनलाईन पोर्टलवरून धुळ्यातून विकत घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.सचिन वाझे प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मंगळवारी सायंकाळी जप्त केलेली मर्सिडीज कार धुळे पासिंगची आहे. ती मनीषा महेंद्र भावसार यांच्या नावावर होती. महेंद्र भावसार यांचे चिरंजीव सारांश भावसार यांनी ती विकत घेतली होती आणि फेब्रुवारी महिन्यात त्यांनी ती ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून विकली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ती सचिन वाझे यांनी विकत घेतली होती.मुकेश अंबानी यांच्या बंगल्यासमोर स्फोटके ठेवताना सीसीटीव्ही कॅमेºयात चित्रित झालेल्या वाहनांमध्ये ही मर्सडीज कार दिसली होती. हिरेन मनसुख मृत्यू प्रकरणाचा तपास करणारी एनआयए या कारच्या शोधात होती.

एनआयएने जप्त केलेल्या मर्सिडीस गाडीतून १७ फेब्रुवारी रोजी मनसुख हिरेन यांनी प्रवास केला होता असे म्हटले जाते. गाडीबरोबर एका फोटोत ठाणे भाजपाचा पदाधिकारी दिसत आहे. त्याबद्दल भाजपाने तात्काळ स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती.

यानंतर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी काँग्रेसवर पलटवार करत वाझे यांना ती मर्सिडिज घेण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि सचिन सावंत यांनी मदत केल्याचा आरोप केला आहे.

Sachin Sawant was caught telling half-truths, Sachin Waze bought a Mercedes car from Dhule

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*