संघाच्या स्वयंसेवकाची बहादुरी, कोरोना व्हॅक्सीनची पहिली चाचणी स्वतःवर करून घेणार

राष्ट्रीय स्वयंंसेवक संघाने चीनी व्हायरसच्या संकटात अतुलनिय सेवाकार्याचे उदाहरण घालून दिले आहे. आता संघाच्याच प्रेरणेतून एक स्वयंसेवक कोरोना व्हॅक्सीनची पहिली मानवी चाचणी स्वत:वर करून घेण्यास तयार झाला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंंसेवक संघाने चीनी व्हायरसच्या संकटात अतुलनिय सेवाकार्याचे उदाहरण घडविले. आता संघाच्याच प्रेरणेतून एक स्वयंसेवक कोरोना व्हॅक्सीनची पहिली मानवी चाचणी स्वत:वर करून घेण्यास तयार झाला आहे.

पश्चिम बंगालमधील चिरंजीव धीवर यांच्यावर ही चाचणी होणार आहे. विशेष म्हणजे ही चाचणी करून घेण्यास ते स्वत:हून तयार झाले आहेत. चिरंजीत याबाबत म्हणाले, त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतूनच चाचणीसाठी तयार होण्याची प्रेरणा मिळाली. कोणाला तरी पुढे येऊन जोखीम घेणे आवश्यक होतेच. मग मी का नाही, असा विचार केला. मानसिकदृष्टया यासाठी मी पूर्ण तयार आहे. अखिल मानवजात आणि देशाच्या सेवेची ही संधी आहे.

चिरंजीवच्या वडलांनीही त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले, कोराना व्हॅक्सीन निश्चित तयार होइॅल. त्यानंतर माझ्या मुलाने जे केले त्याबाबत सर्व जण कृतज्ञता व्यक्त करतील. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या(आइसीएमआर) भुवनेश्वर केंद्रावर या लसीची पहिली मानवी चाचणी होईल. आइसीएमआर आणि भारत बायोटेक यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही चाचणी होणार आहे. १५ ऑगस्टपर्यंत ही लस तयार करण्याचा प्रयत्न असून त्यासाठी मानवी चाचण्यांना सुरूवात होणार आहे.

दुर्गापूर येथील एका शाळेत शिक्षक असणारे चिरंजीव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भारतीय राष्ट्रीय शिक्षक महासंघाच्या प्राथमिक विभागाचे राज्यस्तरीय सदस्य आहे. त्यांनी सांगितले की एप्रिलमध्येच त्यांनी स्वत:वर चाचणी करून देण्याची परवानगी देणारे पत्र लिहिले होते. त्यांना गेल्या आठवड्यात दिल्लीहून एका शास्त्रज्ञाचा फोन आला. आइसीएमआर कडून विकसित केल्या जात असलेल्या या लसीची चाचणी चीनी व्हायरस बाधिताबरोबरच एका निरोगी व्यक्तीवरही करण्यात येणार आहे. चिरंजीव हे निरोगी आहेत.

कोणत्याही लसीची पहिली चाचणी करून घेणे जीवघेणेही ठरू शकते. याचे कारण म्हणजे ज्या रोगावर लस बनवायची आहे, त्याचे विषाणू संबंधित माणसाच्या शरीरात टोचले जातात. त्यातून कदाचित त्यांनाही चीनी व्हायरसची बाधा होऊ शकते. इतर लसींबाबत हा धोका कमी असतो, कारण त्या रोगावरील औषध असते. मात्र, चीनी व्हायरसवर अद्यापपर्यंत कोणतेही औषध नाही,

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*