- भूमीपूजन होण्याच्या आधी श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट स्थानिक स्टेट बँकेच्या शाखेत एक खाते उघडले होते. जमा राशीचा एकूणएक हिशोब ; पैशांची नोंद ठेवली जात आहे.निधी संकलनाला विरोध करणार्यांना उत्तर.
- राम मंदिरासाठी ६०० कोटी रुपयांचे निधी संकलन Rs 600 crore fund raised for Ram Temple
- स्टेट बँकेत ३०० कोटींपेक्षा जास्त निधीचे संकलन
- उर्वरित निधी पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा या दोन बँकांमधील खात्यांमध्ये जमा
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: अयोध्येत राम जन्मभूमी येथे राम मंदिर नव्याने उभारण्यासाठी नागरिकांकडून मोठ्या संख्येने देणग्या दिल्या जात आहेत. आतापर्यंत श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या खात्यात जवळपास सहाशे कोटींचा निधी संकलित झाला आहे. यातील १०० कोटींपेक्षा जास्त रक्कम थेट चेकद्वारे देण्यात आली आहे.
राम मंदिरासाठी संकलित होत असलेला निधी रामनगरी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा यांच्या शाखांमध्ये जमा होत आहे. मकर संक्रांतीपासून राम मंदिरासाठी निधी संकलन सुरू आहे. दररोज जमा होत असलेला निधी बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केला जात आहे. राम मंदिरासाठी देणगी देणाऱ्या प्रत्येकाला संबंधित पैशांची पावती दिली जात आहे.
आतापर्यंत फक्त स्टेट बँकेतच ३०० कोटींपेक्षा जास्त निधीचे संकलन झाले आहे. उर्वरित निधी पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा या दोन बँकांमधील खात्यांमध्ये जमा होत आहे. बँकांच्या खात्यांमध्ये ४७५ कोटींपेक्षा जास्त रक्कम झाली आहे. कोट्यवधी रुपयांचे चेक या आठवड्यात क्लीअर होतील आणि पैसे जमा होतील. पण संबंधित रकमेच्या पावत्या चेक मिळताच देण्यात आल्या आहेत.
Even a small contribution with pure heart for our Prabhu is valuable.
We urge all Rambhakts to come forward & contribute for the construction of a Bhavya & Divya Shri Ram Janmbhoomi Mandir in Ayodhya.
Let's join hands for Shri #RamMandirNidhiSamarpan Abhiyan.
Jai Shri Ram! pic.twitter.com/tNZqjwntAA
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) January 22, 2021
भूमीपूजन होण्याच्या आधी श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट स्थानिक स्टेट बँकेच्या शाखेत एक खाते उघडले होते. या खात्यातही अनेकांनी राम मंदिरासाठी दान केले आहे. तसेच या खात्यामध्ये रामलल्ला विराजमान यांच्यासमोर ‘चढावा’ स्वरुपात ठेवल्या जाणाऱ्या पैशांना जमा केले जात आहे.
दानाच्या स्वरुपात मिळालेली रक्कम तसेच ‘चढावा’ स्वरुपात आलेल्या पैशांची नोंद ठेवली जात आहे. दानाच्या पावत्या तातडीने दिल्या जात आहेत. या खात्यात आतापर्यंत १२५ कोटींच्या घरात रक्कम जमा झाली आहे.