मंदिरात पाणी पिण्यासाठी आला म्हणून मारहाण झालेल्या मुलाच्या मदतीसाठी १० लाख रुपये गोळा

मंदिरात पाणी पिण्यासाठी आलेल्या मुस्लीम धर्मीय मुलाला मारहाण झाल्याच्या प्रकाराचे आता राजकारण सुरू झाले आहे. या मुलाला मदतीसाठी क्राऊड फंडींगद्वारे दहा लाख रुपये गोळा झाले आहेत. ६४८ लोकांनी ही मदत केली आहे. Rs 10 lakh Collection to help the child who was beaten for coming to the temple for drinking water


विशेष प्रतिनिधी

गाझियाबाद : मंदिरात पाणी पिण्यासाठी आलेल्या मुस्लीम धर्मीय मुलाला मारहाण झाल्याच्या प्रकाराचे आता राजकारण सुरू झाले आहे. या मुलाला मदतीसाठी क्राऊड फंडींगद्वारे दहा लाख रुपये गोळा झाले आहेत. ६४८ लोकांनी ही मदत केली आहे.

क्राऊड फंडींग प्लॅटफॉर्म असलेल्या केटोने ही माहिती दिली आहे. गाझियाबादमध्ये मंदिरात पाणी पिण्यासाठी आलेल्या मुस्लीम धर्मीय मुलाला मारहाण करतानाच या घटनेचं चित्रिकरण करण्यात आलं होतं.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी एक पथक तयार केलं होतं. या प्रकरणात भागलपूरच्या गोपाळपूर पोलीस ठाणे हद्दीत एकाला अटक करण्यात आली.

अश्वनीकुमार यादव याचा मुलगा श्रृंगी नंदन यादव याला मारहाणी प्रकरणी अटक करण्यात आली. व्हायरल झालेल्या व्हिडिओत आरोपी श्रृंगी यादव एका मुलाला त्याचं आणि वडिलांचं नाव विचारताना दिसत आहे. मुलाच्या नावावरून तो मुस्लीम धर्मीय असल्याचं लक्षात येत आहे. ‘तू मंदिरात प्रवेश केलासच कसा?’ असा प्रश्न विचारत आरोपी मुलाला मारहाण करताना या व्हिडिओतून दिसत होते.

Rs 10 lakh Collection to help the child who was beaten for coming to the temple for drinking water

Rs 10 lakh Collection to help the child who was beaten for coming to the temple for drinking water

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*