आता रॉबर्ट वड्राही येणार राजकारणात, पंचींग बॅग म्हणून वापरले जात असल्याचा आरोप


बेनामी मालमत्ता प्रकरणात चौकशी सुरू असलेले प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांनीही राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत. राजकीय कुटुंबात असल्याने मला त्रास दिला जातोय. त्यामुळे थेट राजकारणातच यायचे असल्याचे वाड्रा यांनी म्हटले आहे.  Robert Vadra will also enter politics


विशेष  प्रतिनिधी

नवी दिल्ली : बेनामी मालमत्ता प्रकरणात चौकशी सुरू असलेले प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांनीही राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत. राजकीय कुटुंबात असल्याने मला त्रास दिला जातोय. त्यामुळे थेट राजकारणातच यायचे असल्याचे वड्रा यांनी म्हटले आहे. Robert Vadra will also enter politics

रॉबर्ट वड्रा हे कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती आहेत. वड्रा यांचा थेट राजकारणाशी संबंध नसला तरी आतापर्यंत अनेक वेळा कॉंग्रेस पक्ष त्यांच्यामुळे अडचणीत आला आहे. रॉबर्ट वड्रा यांची सध्या आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर अंमलबजावणी संचलनालयाकडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

वड्रा म्हणाले, मी अशा एका परिवाराशी संबंधित आहे की ज्याने अनेक पिढ्या लोकांची सेवा केली आहे. या परिवारातील अनेक जण हुतात्मा झाले आहेत. हे सगळे मी पाहिले आहे. त्यामुळे याच शक्तीनिशी मला लढण्यासाठी संसदेत जायला हवे. ज्या ठिकाणचे लोक मला प्रतिनिधीत्व करण्यासाठी मते देतील तेथून मी निवडणूक लढविन. त्या भागातील लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करेन.


बेनामी संपत्ती गोळा केल्याप्रकरणी आयकर विभागाने रॉबर्ट वाड्रांचा जबाब नोंदविला


लंडनस्थित संपत्ती खरेदी करण्यासाठी रॉबर्ट वड्रा यांच्यावर मनी लॉन्ड्रींगचे आरोप करण्यात आले आहेत. वड्रा यांनी ब्रायनस्टन स्क्वेअरमध्ये १.९ मिलियन पाऊंड किंमत असणारी मालमत्ता मनी लॉन्ड्रींगच्या माध्यमातून खरेदी करण्याचा आरोप आहे. त्यांच्यावर बिकानेर आणि फरीदाबादमधील जमीन घोटाळ्याचा आरोप आहे. ईडीने सांगितल्यानुसार, आयकर विभाग फरार शास्त्र व्यापारी संजय भंडारीविरोधात काळ्या पैशाचा कायदा आणि कर कायद्यांतर्गत दाखल असलेल्या खटल्यांची चौकशी करत होते. ईडीचा आरोप आहे की, लंडनमध्ये भंडारीने 19 लाख पाउंडमध्ये संपत्ती खरेदी केली होती. नंतर त्या घराच्या डागडुजीसाठी 65 हजार 900 पाउंड खर्च केल्यानंतर 2010 मध्ये ही संपत्ती त्याच किमतीत वड्रा यांना विकली.

यावरुन हे स्पष्ट झाले की, भंडारी या संपत्तीचा मुख्य मालक नव्हता. त्याने वड्रा यांना फायदा मिळून देण्यासाठी हा सौदा केला. वड्रा यांनी कॉंग्रेस पक्षाच्या कारभारातही अनेकदा हस्तक्षेप केला होता. महाराष्ट्रातील एका मंत्र्याकडून वड्रा कुटुंबियांनी मुख्यमंत्रीपद देण्यासाठी कोट्यवधी रुपये दिल्याचा आरोपही झाला होता.
या सगळ्या पार्श्वभूमीवर वड्रा म्हणाले की, राजकीय कुटुंबाशी संबंधित असल्यामुळे मला त्रास दिला जात आहे. राजकारणात नसतानाही राजकीय लढाई लढत आहेत. जेव्हा जेव्हा सरकार संकटात असते तेव्हा माझा वापर पंचिंग बॅग म्हणून केला जातो, अशा शब्दांत वड्रा यांनी सरकारवर टीका केली.

Robert Vadra will also enter politics

वड्रा यांनी लोकसभा निवडणुकीवेळी रायबरेली आणि अमेठीत प्रचार केला होता. सोनिया गांधी आणि राहुल गांधी या मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. मुरादाबादमध्ये वाड्रा यांच्यासाठी होर्डिंग्स देखील लावण्यात आले. यावर आपले बालपण या ठिकाणी गेले होते आणि मी इथेच रहावे अशी इथल्या लोकांनी इच्छा होती असा दावा वड्रा यांनी केला होता.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती