राजद नेते शिवानंद तिवारी यांची मुक्ताफळे, म्हणे सचिनला भारतरत्नच द्यायला नको होते

भाजपाद्वेषाने पछाडलेल्या विरोधकांना आता देशभक्तीही चालेनासी झाली आहे. देशाच्या सार्वभौमत्वावर कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही असा इशारा देणारा महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याच्याविरोधात राष्ट्रीय जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी यांनी मुक्ताफळे उधळली आहेत.RJD leader Shivanand Tiwari says Sachin should not have been given Bharat Ratna


प्रतिनिधी

नवी दिल्ली : भाजपाद्वेषाने पछाडलेल्या विरोधकांना आता देशभक्तीही चालेनासी झाली आहे. देशाच्या सार्वभौमत्वावर कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नसल्याचा इशारा देणारा महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याच्याविरोधातही राष्ट्रीय जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी यांनी मुक्ताफळे उधळली आहेत. सचिनला भारतरत्नच द्यायला नको होते, असे त्यांनी म्हटले आहे.शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटिंच्या ट्विटला जोरदार उत्तर दिलं होते. त्यावरून तिवारी म्हणाले, शेतकऱ्यांना ट्वीटचं राजकारण येत नाही.

त्यांना ग्रेटा थनबर्ग किंवा पॉपस्टार रिहानाबद्दल काही माहिती नाही. त्यांच्या ट्वीटला उत्तर देण्यासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांने मैदानात उतरावं हा देशाचा अपमान आहे.

सचिन तेंडुलकरला जेव्हा भारतरत्न देण्यात आला होता, तेव्हाही आपण विरोध केला होता. पुन्हा एकदा सांगतो की, सचिनसारख्या व्यक्तीला भारतरत्न देणं चुकीचं होतं. भारतरत्नने सन्मानित व्यक्त विविध वस्तूंच्या जाहिराती करत नाही.

हा भारतरत्न या सन्मानाचा अपमान आहे. आंतरराष्ट्रीय पॉपस्टार, पर्यावरणवादी ग्रेटा थोनबर्ग यांनी शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट केले होते. त्यावर उत्तर देताना सचिनने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, भारताच्या सार्वभौमत्वाबद्दल कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाऊ शकत नाही.

बाहेरच्या शक्ती पाहू शकतात पण यात सहभागी होऊ शकत नाही. भारतीय नागरिक भारताला ओळखतात आणि भारताबाबत निर्णय घेऊ शकतात. या देशात आम्ही एकत्र राहतो.

शिवानंद तिवारी यांच्या या मुक्ताफळानंतर जेडीयू प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद यांनी म्हटले आहे की, विदेशी सेलिब्रिटींचा सन्मान आणि कोट्यावधी लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सचिन तेंडुलकरचा अपमान, हे काम आरजेडी नेतेच करु शकतात. शिवानंद तिवारी यांनी भारतातील कोट्यवधी लोकांचा अपमान केला आहे.

RJD leader Shivanand Tiwari says Sachin should not have been given Bharat Ratna

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*