जय श्रीराम घोषणेमुळे रिंकू शर्मा याची हत्या; ‘आप’ ने मौन तोडले, दिल्लीतील घटनेचे केंद्रावर फोडले खापर


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जय श्रीराम ही घोषणा दिल्यामुळे रिंकू शर्मा याची हत्या झाली होती. जय श्रीराम ही घोषणा भारतात द्यायची नाही तर पाकिस्तानात द्यायची का? असे आम आदमी पक्षाचे प्रवक्ते राघव चढ्ढा यांनी सांगितले. तसेच आज भाजप राजवटीत हिंदू-मुस्लिम – ख्रिश्चन- सुरक्षित नसल्याचा आरोपही त्यांनी केला. Rinku Sharma assassinated over Jai Shriram declaration Aap broke central govt

बजरंग दलाचा कार्यकर्ता असलेल्या रिंकू शर्मा याची त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीवेळी काही कारणावरून भांडणे झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती. त्यानंतर भाजप कार्यकर्ते कपिल मिश्रा यांनी शर्मा यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी 1 कोटी रुपये गोळा करण्याचा संकल्प सोडला होता. तसेच शर्मा हत्याकांडावर सांत्वनाचा एकही शब्द व्यक्त केला नाही म्हणून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीवर टीका केली होती. यानंतर प्रथमच आपकडून ही प्रतिक्रिया राघव चढ्ढा यांनी दिली आहे.राघव चढ्ढा म्हणाले, रिंकूच्या पालकांनी संगितले की, त्याने जय श्रीराम ही घोषणा केल्याने त्याची हत्या झाली. खरे तर दिल्ली राज्याच्या कायदा व सुव्यस्थेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. केंद्राने अशा हत्या रोखण्यासाठी उपाययोजना करावी.

केंद्रात भाजपचं सरकार असताना रिंकू शर्मा या हिंदूची हत्या होते. त्यामुळे भाजप राजवटीत हिंदू बरोबर मुस्लिम- ख्रिश्चनही असुरक्षित आहेत, असा आरोप त्यांनी केला. दिल्ली पोलिस केंद्रिय गृहमंत्रालयाला रिपोर्ट करत असतात. त्यामुळे दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सर्वस्वी केंद्राची आहे. गृहमंत्री अमित शहा, पोलीस आयुक्त शर्मा यांच्या कुटुंबांना का भेटत नाहीत, असा प्रश्न त्यांनी केला.

रिंकू शर्मा के ‘जय श्री राम’ का नारा लगाने पर उनकी हत्या हुई। अगर भारत मे जय श्री राम का नारा बुलंद नहीं होगा तो क्या पाकिस्तान में होगा? आज भाजपा के राज में हिन्दू-मुस्लिम-सिख कोई सुरक्षित नहीं है

Rinku Sharma assassinated over Jai Shriram declaration Aap broke central govt

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी