शेतकरी आंदोलनावर टिवटिव करणाऱ्या रिहानाचे झाले हसे, सोशल मीडियावर आला मीम्सचा पूर

शेतकरी आंदोलनावर अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी ट्वीट करायला सुरुवात केली आहे. अमेरिकीची प्रसिद्ध पॉप गायिका रिहानाने एक बातमी शेअर करत आपण शेतकरी आंदोलनावर का बोलत नाहीत? असे ट्वीट केले आहे. रिहानाच्या या ट्विटनंतरच विविध आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाविषयी ट्विट केले आहे. परंतु, याची सुरुवात करणाऱ्या रिहानाचेच आता सोशल मीडियावर हसे होत आहे. सोशल मीडियावर रिहानावरील मीम्सचा पूर आलेला आहे. Rihanna who was tweeted about farmers Protest Got Trolled, Social Media Flooded With Memes


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनावरून आता आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटीही बोलू लागले आहेत. दिल्लीतल्या आंदोलकांना सरकारने कैक वेळा चर्चेला बोलावूनही अद्याप तोडगा निघालेला नाही. शेतकरी नेत्यांच्या दुराग्रहामुळेच सर्वसामान्य शेतकऱ्यांना कठीण परिस्थितीतून जावे लागत आहे. विरोधक केवळ राजकारण करण्यातच व्यग्र आहेत, तिकडे सामान्य शेतकरी कृषी कायद्यांविषयी झालेल्या गैरसमजामुळे नाहक भरडला जात आहे.

आता शेतकरी आंदोलनावर अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी ट्वीट करायला सुरुवात केली आहे. अमेरिकीची प्रसिद्ध पॉप गायिका रिहानाने एक बातमी शेअर करत आपण शेतकरी आंदोलनावर का बोलत नाहीत? असे ट्वीट केले आहे. रिहानाच्या या ट्विटनंतरच विविध आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाविषयी ट्विट केले आहे. परंतु, याची सुरुवात करणाऱ्या रिहानाचेच आता सोशल मीडियावर हसे होत आहे. सोशल मीडियावर रिहानावरील मीम्सचा पूर आलेला आहे.

तत्पूर्वी, बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतने रिहानाला चोख प्रत्युत्तर दिले आहे. कंगना म्हणाली की, “कोणीही याबद्दल बोलत नाही कारण ते शेतकरी नाहीत तर भारताचे विभाजन करण्याचा प्रयत्न करणारे दहशतवादी आहेत. जेणेकरून चीनसारखे देश आमच्या देशाचा ताबा घेतील आणि अमेरिकेसारखी चिनी वसाहत बनवतील. तू शांत बैस, मूर्ख! आम्ही तुमच्यासारखे मूर्ख नाही, जे आपला देश विकतील.”

सोशल मीडियावर मीम्सचा पूर

Rihanna who was tweeted about farmers Protest Got Trolled, Social Media Flooded With Memes

कंगनाच्या या उत्तरावर रिहानाने प्रतिक्रिया दिली नाही, परंतु सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला आहे. या वादग्रस्त विषयावर नेटकऱ्यांची मते विभागली गेलीच असे नाही, तर अनेकांनी ती मजेदार पद्धतीने मांडली. रिहानाच्या कोणत्याही ट्विटवर इतकी चर्चा सुरू होण्याची ही पहिली वेळ नाही. रिहानाने अनेकदा वाद ओढवून घेतलेले आहेत. ती कधीकधी तिच्या गाण्यांच्या माध्यमातून वाद निर्माण करते, तर कधी तिचा फॅशन सेन्स चर्चेचा विषय बनतो. पण हे सर्व असूनही ती सतत आपली मते मांडत असते. शेतकरी चळवळीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना तिने पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे.

Kangana's strong response to pop star Rihanna who tweeted about farmers protest

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*