जगातील सर्वाधिक श्रीमंत एलॉन मस्क यांची गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राऐवजी बंगळुरूला पसंती


जगातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती असलेल्या एलॉन मस्क यांनी गुंतवणुकीसाठी बंगळुरूची निवड केली आहे. टेस्ला या बहुचर्चित इलेक्ट्रिक मोटारीची सबसिडरी कंपनी बंगळुरू येथे स्थापन होणार आहे. महाराष्ट्रातल्या ठाकरे-पवार सरकारवर विश्वास टाकण्याऐवजी मस्क यांनी कर्नाटकाची निवड केली आहे. richest man in the world Elon Musk prefers Bangalore over Maharashtra for investment


वृत्तसंस्था

बंगळुरू : जगातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती असलेल्या एलॉन मस्क यांनी गुंतवणुकीसाठी बंगळुरूची निवड केली आहे. टेस्ला या बहुचर्चित इलेक्ट्रिक मोटारीची सबसिडरी कंपनी बंगळुरू येथे स्थापन होणार आहे.

रजिस्ट्रार ऑफ कंपनीच्या माहितीनुसार, या नवीन कंपनीचे नाव टेस्ला इंडिया मोटर्स आणि एनर्जी प्रा. लि. असे असणार आहे. कर्नाटकाची राजधानी असलेल्या बंगळुरू येथे ही नवीन कंपनी स्थापन होणार आहे. या कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय लव्हली रोड या भागात असणार आहे.


अमेझॉन विरोधात नेटकऱ्यांचा संताप; ट्विटरवर अमेझॉन आणि किंडल विरोधात ट्रेंड टॉपवर


कर्नाटकच्या वाणिज्य आणि उद्योग विभागाचे प्रधान सचिव गौरव गुप्ता म्हणाले, आम्ही गेल्या काही महिन्यांपासून टेस्लाशी चर्चा करत होतो. त्यांनी आपल्या कंपनीचे कार्यालय बंगळुरू येथे सुरू केले ही आनंदाची गोष्ट आहे. आम्ही त्यांना पटवून दिले की बंगळुरू ही केवळ टेक्नॉलाजीची राजधानी नाही तर एरोस्पेस आणि स्पेस टेक्नॉलॉजीचीही राजधानी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आवश्यक टॅलेंटही उपलब्ध आहे. या ठिकाणी कंपनीचे सेल्स ऑफीस त्याचबरोबर संशोधन आणि विकास विभागही सुरू होईल.

कर्नाटक सरकारने यापूर्वी म्हटले होते की टेस्ला या ठिकाणी संशोधन आणि विकास विभाग सुरू करेल. परंतु, त्यांना मॅन्यूफॅक्चरींग युनीट सुरू करायचे असल्यासही जमीन आणि इतर सुविधा पुरविण्यात येतील. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी डिसेंबरमध्येच टेस्ला कंपनी भारतात येण्याविषयी संकेत दिले होते. विक्री आणि उत्पादन विभागाचे काम येथे सुरू होईल, असे त्यांनी सांगितले होते.

कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी ग्रीन व्हेईकल टेक्नॉलॉजी आणत आहे. त्याच वेळी टेस्लासारखी जगप्रसिध्द कंपनी भारतात येणे महत्वाचे मानले जात आहे.

richest man in the world Elon Musk prefers Bangalore over Maharashtra for investment

डाटा अ‍ॅनालिस्ट पुनीत गुप्ता म्हणाले, टेस्ला हा जगातील इलेक्ट्रिक कारचा सर्वात मोठा ब्रॅंड मानला जातो. त्यामुळेच टेस्ला भारतात येणे ही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत सकारात्मक बाब आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले आहे की, ग्रीन मोबीलिटीसाठीच्या देशाच्या प्रवासात कर्नाटक नेतृत्व करण्यास तयार आहे. इलेक्ट्रिक कार उत्पादक असलेली टेस्ला कंपनी लवकरच बंगळुरू येथे संशोधन आणि विकास विभाग सुरू करत आहे. मी एलॉन मस्क यांचे भारतात आणि कर्नाटकात स्वागत करतो.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती