एनआयएचा मोठा खुलासा; अँटिलियाबाहेरच्या CCTV मध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच!

वृत्तसंस्था

मुंबई : अँटिलियाच्या बाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या कुणी? या प्रश्नाचे उत्तर अद्याप सापडले नसले तरी अँटिलियाबाहेरच्या सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच असल्याचे एनआयएने आता स्पष्ट केले आहे.revelation of the NIA; The only person to appear on CCTV outside Antilia is Sachin!

एएनआयने यासंदर्भात माहिती दिली असून सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीने PPE किट घातलेले नसून साधा कुर्ता-पायजमा घातला असल्याचे देखील एनआयएने सांगितले आहे.या प्रकरणी अँटिलियाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्यांच्या प्रकरणाचा तपास एनआयए करत असून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे. मुंबई सीआययूचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा या प्रकरणात असलेला कथित सहभाग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यानच्या काळात अँटिलियाबाहेरचे एक सीसीटीव्ही फूटेज एनआयएने तपासासाठी घेतल्यानंतर ते सोशल मीडियावर देखील व्हायर होऊ लागले. सीसीटीव्ही फूटेजमध्ये एक व्यक्ती PPE किट घालून अँटिलियाच्या बाहेरून जात असल्याचे दिसत आहे. मात्र, आता हे पीपीई किट नसून तो कुर्ता-पायजमा असल्याचे एनआयएने स्पष्ट केले आहे.

तसेच, ते सचिन वाझेच असून त्यांनी आपला चेहरा ओळखू येऊ नये म्हणून मोठ्या हातरुमालाने झाकून घेतला आहे, असे देखील एनआयएने म्हटले आहे. आपली हालचाल कुणाच्या लक्षात येऊ नये, म्हणून सचिन वाझेंनी कुर्ता-पायजमा घातल्याचे देखील एनआयएने सांगितले आहे.

दरम्यान, एनआयएने सचिन वाझे यांच्या कार्यालयातून लॅपटॉप जप्त केला होता. मात्र, या लॅपटॉपमधील सर्व डाटा आधीच डिलीट केल्याचं एनआयएच्या निष्पन्न झालं आहे. तसेच, सचिन वाझे यांच्याकडे चौकशीदरम्यान त्यांच्या मोबाईल फोनची मागणी केली असता तो हरवल्याचे त्यांनी सांगितले. पण तो हरवला नसून त्यांनी कुठेतरी फेकून दिला आहे, असे देखील एनआयएचं म्हणणे आहे.

“त्या मर्सिडीजसोबत भाजपा पदाधिकाऱ्याचा फोटो, भाजपाचे नेते याचा खुलासा करतील का?” एनआयएने एक मर्सिडिज कार देखील ताब्यात घेतली असून त्याचा देखील तपास सध्या सुरू आहे. या कारमध्ये एनआयएला कॅश आणि नोटा मोजण्याचं मशिन सापडलं आहे. ही कार सचिन वाझे यांनी वापरली असल्याचा एनआयएला संशय असून त्या दिशेनं तपास सुरू असतानाच आता या कारसोबत काही भाजपा पदाधिकाऱ्यांचे फोटो सापडल्यामुळे नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

revelation of the NIA; The only person to appear on CCTV outside Antilia is Sachin!

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*