आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवली, निवडक मार्गांवर मुभा असल्याची डीजीसीएची माहिती

Restrictions on international flights until 28 February, given the state of the corona worldwide

कोरोना महामारीमुळे नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर लादलेली बंदी आता 28 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. जगभरातील कोरोनाची स्थिती लक्षात घेता निवडक मार्गांवर नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे घेता येतील, अशी घोषणा नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) गुरुवारी केली. Restrictions on international flights until 28 February, given the state of the corona worldwide


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर लादलेली बंदी आता 28 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. जगभरातील कोरोनाची स्थिती लक्षात घेता निवडक मार्गांवर नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे घेता येतील, अशी घोषणा नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) गुरुवारी केली.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान कंपन्या गतवर्षी 23 मार्चपासून देशात स्थगित आहेत; पण मे महिन्यात ‘वंदे भारत’ मोहिमेअंतर्गत विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यात आली होती. काही देशांशी असलेल्या करारानुसार गतवर्षी जुलैपासून हवाई बबल सेवा सुरू करण्यात आल्या.

Restrictions on international flights until 28 February, given the state of the corona worldwide

अमेरिका, यूके, यूएई, केनिया, भूतान आणि फ्रान्स यासह 24 देशांशी भारताने हवाई बबल करार केला आहे. अनलॉकच्या प्रक्रियेनंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणे काही प्रमाणात सुरू होती, परंतु ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा घातक स्ट्रेन आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भारताने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घातली. आता हेच प्रतिबंध फेब्रुवारीअखेरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Restrictions on international flights until 28 February, given the state of the corona worldwide

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था