नाना पटोले यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही नाराज, पुन्हा मतदानाला सामोरे जाण्याच्या शक्यतेने महाविकास आघाडी धास्तावली

कॉंग्रेसचे नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहेत. पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा लढवावी लागणार असल्याच्या शक्यतेने महाविकास आघाडी धास्तावली आहे.resignation of Nana Patole, the Chief Minister and also the Deputy Chief Minister


प्रतिनिधी

मुंबई : कॉंग्रेसचे नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा लढवावी लागणार असल्याच्या शक्यतेने महाविकास आघाडी धास्तावली आहे. कॉंग्रेसमधील अंतर्गत राजकारणावरून नाना पटोले विधानसभा अध्यक्षपद सोडून कॉंग्रेसचे अध्यक्ष होणार आहेत.यामुळे विधानसभा अध्यक्षपद रिक्त होणार आहे. येथे निवडणूक घ्यावी लागणार आहे.

गेल्या वेळी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लढविताना महाविकास आघाडीची दमछाक झाली होती. आता पुन्हा हेच करायचे तर त्यासाठी उध्दव ठाकरे आणि अजित पवार यांनाच सगळी मेहनत करावी लागणार आहे.

महाविकास आघाडीचे सरकार स्थिर होत असताना राजीनामा देण्याची गरज नव्हती असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे पुन्हा एकदा सरकारसमोर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुद्दा समोर येणार आहे. सह्याद्रीवरील मंत्रीमंडळ बैठकीनंतर याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा ट्विस्ट आला आहे. विधानसभा अध्यक्षपद तिन्ही पक्षांचं होतं, आता ते खुलं झालं आहे. आता विधानसभा अध्यक्षपदावर पुन्हा चर्चा होणार आहे, असे पवार म्हणाले.

resignation of Nana Patole, the Chief Minister and also the Deputy Chief Minister

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*