Uttarakhand Glacier Burst Live Updates : बोगद्यात अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी बचाव कार्य, आतापर्यंत 14 मृतदेह सापडले


विशेष प्रतिनिधी

चमोलीः उत्तराखंड मध्ये जोशी मठ परिसरामध्ये काल हिमकडा कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या भागात धौलीगंगा नदीवरीला ऋषी गंग़ा पॉवर प्रोजेक्टवर नुकसान झालेले आहे. अनेकांचा मृत्यू झालाय. आतासुद्धा काही जण अपघात घडलेल्या ठिकाणी अडकलेले आहेत. तसेच 32 लोकांना रेस्क्यू करून सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आलं आहे.121 अद्यापही बेपत्ता आहेत . Rescue work to rescue people trapped in the tunnel, so far 14 bodies have been found
एनडीआरएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रभर बचावकार्य चालूच होते. बचावात गुंतलेल्या सर्व एजन्सी समन्वयाने काम करत आहेत. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय नियंत्रण कक्षातील प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून आहेत.आतापर्यंत मदत व बचाव कार्यात चमोली जिल्हा पोलिसांनी 14 मृतदेह सापडल्याची पुष्टी केली आहे. असे सांगितले जात आहे की अद्याप 125 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. रात्रीही बचावकार्य सुरूच होते. नुकसानीचे मूल्यांकन चालू आहे. पहाटे चारपासून पुन्हा एकदा बचावकार्य सुरू झाले आहे. बोगद्याजवळ डेब्रिज काढला जात आहे. असे मानले जाते की बरेच लोक त्यांच्यामध्ये अडकले आहेत. या अपघातात प्राण गमावलेल्या लोकांच्या कुटुंबियांना राज्य आणि केंद्र सरकारने भरपाई जाहीर केली आहे. राज्य सरकार चार तर केंद्र सरकार दोन लाख रुपयांचे योगदान देईल. सैन्य, वायुसेना, एनडीआरएफ, आयटीबीपी आणि एसडीआरएफच्या टीम्स मदत व बचाव कार्यांसाठी स्थानिक प्रशासनाबरोबर काम करत आहेत. 
दरम्यान, दुर्घटनेत अडकलेल्यांंना वाचवण्यासाठी  एरियल रेस्क्यू साठी  h Mi-17 आणि  ALH हेलिकॉप्टर हवाई बचाव आणि मदत मोहीम देहरादून ते जोशीमठ येथे पुन्हा सुरू करण्या आले.भारतीय हवाई दलाने ही माहिती दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावरून आता या दुर्घटनेत बळी गेलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

Rescue work to rescue people trapped in the tunnel, so far 14 bodies have been found

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती