Republic Day 2021 : हाडे गोठवणाऱ्या थंडीतही आयटीबीपी जवानांचा उत्साह, तिरंगा फडकावून दाखवला ‘जोश’


देशाच्या विविध भागांमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा फडकावण्यास सुरुवात झाली आहे. आयटीबीपीच्या जवानांनी लडाखमध्ये तिरंगा फडकावला. इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांनी हाडे गोठवणाऱ्या उणे 25 अंश तापमानात तिरंगा फडकावला. Republic Day 2021: ITBP Soldiers Celebrate Republic Day by Waving Tricolors


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशाच्या विविध भागांमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा फडकावण्यास सुरुवात झाली आहे. आयटीबीपीच्या जवानांनी लडाखमध्ये तिरंगा फडकावला. इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांनी हाडे गोठवणाऱ्या उणे 25 अंश तापमानात तिरंगा फडकावला.


एकूण 119 जणांना पद्म पुरस्कार, जपानचे माजी पीएम शिंजो आबे यांना पद्मविभूषण, पाहा संपूर्ण यादी


आजचा दिवस हा देशासाठी खूप महत्त्वाचा आहे. भारत आज आपला 72वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. थंडीच्या मोसमात मंगळवारी दिल्लीच्या राजपथावर ऐतिहासिक परेडचे आयोजन होत आहे, यातून भारत जगाला आपल्या सामर्थ्याची जाणीव करून देत आहे. आज सार्वभौम भारताच्या सामर्थ्याचे, संस्कृतीचे आणि गौरवशाली इतिहासाचे चित्र राजपथावर दिसत आहे.

Republic Day 2021: ITBP Soldiers Celebrate Republic Day by Waving Tricolors

दरम्यान, डोळ्यांत तेल घालून प्रसंगी प्राणांची बाजी लावून देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांचा उत्साहही प्रेरणादायी असल्याचे दिसून येते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे संरक्षण करणाऱ्या जवानांचा उत्साह या व्हिडिओतून दिसून येत आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती