कोरोनावरील अमेरिकेची मॉडर्ना लस भारतात येण्याची शक्यता, टाटा ग्रुपशी बोलणी सुरू?

Talks with Tata Group begin over US coronavirus modern vaccine

अमेरिकेत निर्मिती झालेली कोरोनावरील मॉडर्ना लस लवकरच भारतात उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मॉडर्ना लस भारतात आणण्यासाठी टाटा ग्रुपच्या हेल्थ व्हेंचरशी बोलणी सुरू आहे. टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्स ही संस्था आयसीएमआरसह मिळून भारतात मॉडर्ना लसीच्या वैद्यकीय चाचण्या लवकरच घेऊ शकतात. Reports About Tata Group In Talks with Moderna Vaccine likely to Available in India soon 


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अमेरिकेत निर्मिती झालेली कोरोनावरील मॉडर्ना लस लवकरच भारतात उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मॉडर्ना लस भारतात आणण्यासाठी टाटा ग्रुपच्या हेल्थ व्हेंचरशी बोलणी सुरू आहे. टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्स ही संस्था आयसीएमआरसह मिळून भारतात मॉडर्ना लसच्या वैद्यकीय चाचण्या घेऊ शकतात. अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. तथापि, मॉडर्नाने अद्याप याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

फायझर लस उणे 70 अंश सेल्सिअस किंवा त्याहून कमी तापमानात ठेवण्याची गरज आहे, परंतु मॉडर्नाची लस ही सामान्य फ्रीजच्या तापमानातही ठेवली जाऊ शकते. ही लस भारतासारख्या मर्यादित कोल्ड स्टोरेज असलेल्या देशांसाठी अधिक उपयुक्त आहे.नोव्हेंबरमध्ये मॉडर्नाच्या अखेरच्या टप्प्यातील चाचणीच्या आकडेवारीनुसार ही लस 94.1 टक्के प्रभावी असल्याचे आढळले. लस घेतल्यानंतर गंभीर दुष्परिणाम होण्याचा कोणताही धोका नाही. अमेरिकेने डिसेंबरमध्ये, तर या महिन्याच्या सुरुवातीच्या काळात युरोपियन देशांमध्ये मॉडर्ना लसीला मंजुरी मिळालेली आहे.

Reports About Tata Group In Talks with Moderna Vaccine likely to Available in India soon

कोणताही लस उत्पादक भारतात येण्यापूर्वी येथील लोकांवर चाचण्या घेण्याचे भारताने बंधनकारक केले आहे. सध्या देशात भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन आणि ऑक्सफोर्ड अॅस्ट्राझेनेकाच्या सीरम संस्थेने तयार केलेल्या कोव्हिशील्ड लसींना मंजुरी मिळालेली आहे. या दोन्ही लसींची निर्मिती भारतातच झालेली आहे.

Talks with Tata Group begin over US coronavirus modern vaccine

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती