Reliance, Google, Facebook, Tata, Amazon start preparations To Enter in the world of digital payments

Digital Paymentच्या जगतात दिग्गज कंपन्यांची लवकरच एंट्री; रिलायन्स, गुगल, फेसबुक, टाटा, अमेझॉनची तयारी सुरू

रिलायन्स इंडस्ट्रीज, गुगल, फेसबुक, टाटा, अमेझॉन, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँकेसह अनेक दिग्गज कंपन्या लवकरच भारताच्या डिजिटल पेमेंट (Digital Payment) मार्केटमध्ये एंट्री करणार आहेत. रिझर्व्ह बँकेने अलीकडेच न्यू अंब्रेला एंटिटी म्हणजेच NUE साठी अर्ज भरण्याची तारीख 31 मार्चपर्यंत वाढविली आहे. यापूर्वी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारीपर्यंत होती. एनयूईच्या मदतीने या कंपन्या यूपीआयसारखे पेमेंट नेटवर्क तयार करण्यास सक्षम असतील. यामुळे डिजिटल पेमेंट मार्केटमध्ये स्पर्धा वाढेल. Reliance, Google, Facebook, Tata, Amazon start preparations To Enter in the world of digital payments


विशेष प्रतिनिधी

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज, गुगल, फेसबुक, टाटा, अमेझॉन, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँकेसह अनेक दिग्गज कंपन्या लवकरच भारताच्या डिजिटल पेमेंट (Digital Payment) मार्केटमध्ये एंट्री करणार आहेत. रिझर्व्ह बँकेने अलीकडेच न्यू अंब्रेला एंटिटी म्हणजेच NUE साठी अर्ज भरण्याची तारीख 31 मार्चपर्यंत वाढविली आहे. यापूर्वी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारीपर्यंत होती. एनयूईच्या मदतीने या कंपन्या यूपीआयसारखे पेमेंट नेटवर्क तयार करण्यास सक्षम असतील. यामुळे डिजिटल पेमेंट मार्केटमध्ये स्पर्धा वाढेल.

‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, न्यू अंब्रेला एंटिटीसाठी कन्सॉर्टियम ऑफ कंपनीज शर्यतीत आहे. रिलायन्स, इन्फिबीम अ‍ॅव्हेन्यूज, गुगल आणि फेसबुक मिळून एनयूईच्या शर्यतीत उतरले आहेत. एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, मास्टरकार्ड, पेयू हे टाटा समूहासह एकत्रित आहेत. तर दुसरीकडे अमेझॉन, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, पाइन लॅब, बिलडेस्क आणि व्हिसा कार्ड एकत्र आले आहेत. पेटीएम, इंडसइंड बँक, ओला फायनान्शियल, सेन्ट्रम फायनान्स, जेटपे आणि ईपीएस हे एका कन्सॉर्टियममध्ये आहेत.एकाही सरकारी बँकेला रस नाही

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही बँकेने एनयूईमध्ये रस दाखविला नाही. कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करण्यात रस दाखविलेला नाही. न्यू अम्ब्रेला एंटिटीसंदर्भात बँकर्स म्हणतात की, हे आल्याने यूपीआय आणि आयएमपीएसचे इन्फ्रा अधिक मजबूत होईल. या कंपन्या स्वत:साठी स्वतंत्र पेमेंट प्लॅटफॉर्म तयार करणार नाहीत.

आता हे सर्व वेगवेगळे कन्सॉर्टियम आपापल्या प्रस्तावांवर काम करत आहेत. ते डिजिटल अर्थव्यवस्थेला कसे चालना देतील आणि जास्तीत जास्त लोकांना या व्यासपीठावर जोडण्यासाठी कसे काम करतील, यावरून त्यांना रिझर्व्ह बँकेला प्रभावित करावे लागणार आहे. वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रतिनिधी रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत. याशिवाय नियमनासंबंधित कामही सुरू आहे. अर्ज सादर केल्यानंतर रिझर्व्ह बँक त्यांच्या प्रस्तावाचा अभ्यास किमान सहा महिने करेल. आणि यातून रिझर्व्ह बँक 2 एनयूईला परवाना देण्याचीही शक्यता आहे.

Reliance, Google, Facebook, Tata, Amazon start preparations To Enter in the world of digital payments

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*