राऊत-पवार गुळपीठ आता कॉँग्रेसच्या मुळावर, सोनिया गांधींना हटवून पवारांना यूपीएचे अध्यक्ष करण्याची मागणी

महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार आणि संजय राऊत यांचे गुळपीठ झाले आणि शिवसेची भाजपासोबतची युती तुटली गेली. शिवसेना आणि राष्टÑवादीच्या मागे फरफटत गेलेल्या कॉँग्रेसच्याच मुळावर आता हे गुळपीठ आले आहे. सोनिया गांधी यांना हटवून शरद पवार यांना संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीच्या (यूपीए) आणण्याची मागणी राऊत यांनी केली आहे.Raut-Pawar duo now at the root of Congress, demands removal of Sonia Gandhi and appointment of Pawar as UPA President


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार आणि संजय राऊत यांचे गुळपीठ झाले आणि शिवसेची भाजपासोबतची युती तुटली गेली. शिवसेना आणि राष्टÑवादीच्या मागे फरफटत गेलेल्या कॉँग्रेसच्याच मुळावर आता हे गुळपीठ आले आहे. सोनिया गांधी यांना हटवून शरद पवार यांना संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीच्या (यूपीए) आणण्याची मागणी राऊत यांनी केली आहे.

शिवसेनेचे खासदार आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मधुर संबंध सर्वांनाच माहित आहे. या दोघांच्या चर्चेतूनच राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.कॉँग्रेसच्या नेतृत्वाची इच्छा नसतानाही स्थानिक नेत्यांच्या आग्रहामुळे कॉँग्रेस या सरकारमध्ये सामील झाली. आता राऊत यांनी थेट कॉँग्रेसच्या नेतृत्वावरच निशाणा साधला आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी यूपीएचे पुनर्गठन व्हावे आणि त्याचे अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे द्यावे अशी मागणी केली आहे.

यूपीएपच्या म्हणजेच कॉँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. नेतृत्व बदलून, ते अशा हाती देण्यात यावं ज्यांना विरोधक स्वीकारतील अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी शरद पवार यांचे नाव सुचविले आहे.

राऊत म्हणाले, महाराष्ट्रात जो प्रयोग झाला आहे, तो उत्तम आहे. संपूर्ण देश आमच्याकडे पाहतोय. आम्ही वारंवार आव्हान केलं आहे की, यूपीएचे पुनर्गठन केलं पाहिजे. काँग्रेस पक्ष मजबूत व्हायचा असेल तर यूपीए मजबूत करायला हवे आणि यूपीए, मजबूत करायचं असेल तर त्याचं नेतृत्व अशा व्यक्तीच्या हाती द्यावे जो अ‍ॅक्टिव्ह असेल आणि विरोधकांमध्ये त्यांच्या नावावर सहमती असेल.

तेव्हा संजय राऊतांना असं कुठलं व्यक्तीमत्व आहे ज्याच्या नावावर सहमती होईल, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा राऊत यांनी आता तरी फक्त शरद पवार यांचंच नाव समोर येते.

कॉँग्रेस पश्चिम बंगालमध्ये लढत असलेल्या तृणमूल कॉँग्रेस, पंजाबमधील कॉँग्रेसचा मुख्य शत्रू असलेला अकाली दल यांच्यासारखे पक्ष यूपीएमध्ये का नाहीत, असा सवालही त्यांनी केला आहे. या पक्षांना यूपीएमध्ये घेण्यास कॉँग्रेस तयार होईल का याबाबत मात्र राऊत यांनी काहीही बोलणे टाळले आहे.

Raut-Pawar duo now at the root of Congress, demands removal of Sonia Gandhi and appointment of Pawar as UPA President

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*