राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ध्येय, निष्ठेचे व्रत स्वीकारून कार्य करतात. समाजाला जोडणारा, उन्नत करणारा आणि पुढे नेणारा हा धर्म आहे. मैं नहीं तूही, असेच संघ स्वयंसेवकांचे कार्य असते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.Rashtriya Swayamsevak Sangh religion connects uplifts and takes the society forward
प्रतिनिधी
अकोला : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ध्येय, निष्ठेचे व्रत स्वीकारून कार्य करतात. समाजाला जोडणारा, उन्नत करणारा आणि पुढे नेणारा हा धर्म आहे. मैं नहीं तूही, असेच संघ स्वयंसेवकांचे कार्य असते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
शंकरलाल खंडेलवाल जन्मशताब्दी समारोह समितीद्वारे आयोजित कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक म्हणाले की, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिक्षण घेतानाच, शंकरलाल खंडेलवाल यांच्याशी संपर्क आला.
एका सामान्य कार्यकर्त्यांसोबत संपर्क, ओळख करण्याची शैली भावनिक होती. संघ कार्यासोबतच मी खंडेलवाल कुटुंबीयांशी कायम जोडला गेलो. अकोल्यात संघाचा प्रचारक म्हणून काम करताना, शंकरलालजी, गीतादेवी यांनी स्नेह दिला.
सर्व समाजाला सोबत घेऊन आणि ध्येयाप्रती सजग राहून शंकरलाल खंडेलवाल यांनी संघ कार्यासोबत सामाजिक, राजकीय व शैक्षणिक कार्य केले. काम करताना त्यांना अहंकार कधीही शिवला नाही.