मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील कोरोना पॉझिटिव्ह

  • त्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानीच क्वारंटाईन होणार आहेत. रश्मी ठाकरे सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Rashmi Thackeray Corona Positive)

 

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि दैनिक ‘सामना’च्या संपादक रशमी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. रश्मी ठाकरे यांची सोमवारी रात्री कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांची प्रकृती स्थिर असून त्या सध्या वर्षा निवास्थानीच होम क्वारन्टाइन झाल्या आहेत.Rashmi Thackeray Corona Positive

मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांचीही कोरोना चाचणी काही दिवसांपूर्वीच पॉझिटिव्ह आली होती.

त्यानंतर रश्मी ठाकरे यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचा विळखा आता मुख्यमंत्र्यांच्या घरालाही पडल्याचं दिसत आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही कोरोना पॉझिटिव्ह

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनीही ट्विट करत कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती दिली होती. राज्यात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना फोफावत आहे.

आता तर हा कोरोना थेट मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबात शिरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यानंतर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढलीय.

Rashmi Thackeray Corona Positive

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*