रश्मी शुक्लांच्या अहवालात नेमकी कोणाची नावे??… अर्धा डझन एजंट, ४० हून अधिकारी – राजकारणी?? त्यांच्यावर आता तरी कारवाई होणार…??

विशेष प्रतिनिधी

मुंबई – सचिन वाझे – गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खंडणीखोरी प्रकरणा पाठोपाठ महाराष्ट्रातले पोलीसांच्या बदलीचे आणि पोस्टिंगचे रॅकेट उघडकीस येते आहे… ते ज्यांच्या अहवालामुळे उघड होण्याची शक्यता आहे, त्या कमिशनर, इंटेलिजन्स रश्मी शुक्ला यांच्या त्या अहवालात नेमके दडलेय काय… त्यामध्ये नेमकी कोणाची नावे आहेत… कोण – कोण यात गुंतले आहे, याची जोरदार चर्चा महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात सुरू आहे. rashmi shulka report; will the names of police transfer agents and over 40 police officers be reveled now??

ज्या फोन टॅपिंगद्वारे रश्मी शुक्लांनी राज्यातील पोलिसांच्या बदल्याचे रॅकेट उघडकीस आणले होते. ते फोन टॅपिंग केंद्रीय गृह खात्यातील वरिष्ठांच्या परवानगीनंतरच करण्यात आले होते, असे आता स्पष्ट झाले आहे.पोलीसांच्या बदल्या आणि पोस्टिंग संदर्भातील अहवाल रश्मी शुक्ला यांनी त्यावेळच्या राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिला होता. या अहवालात जवळपास अर्धा डझन एजंट्स आणि ४० हून अधिक अधिकाऱ्यांची आणि राजकारण्यांची नावे आहेत. पोलिसांच्या बदल्यांचे रॅकेट चालवणाऱ्या दलालांनी किती अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, यासंदर्भातील यादीच या अहवालात रश्मी शुक्ला यांनी दिलेली आहे, असे समजते.

रश्मी शुक्लांनी दिलेला हा अहवाल त्यावेळच्या पोलीस महासंचालकांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पाठविला होता. तोच अहवाल मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांनाही पाठवला होता. परंतु, त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती, असा दावा आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

आता या प्रकरणावरून फडणवीस यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्याचबरोबर न्यायालयात जाण्याची तयारीही दाखविली आहे. अशा स्थितीत रश्मी शुक्लांनी अहवालात नमूद केलेली अर्धा डझन एजटांची नावे आणि ४० हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांची आणि राजकारण्यांची नावे जनतेच्या समोर येतील का… हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

rashmi shulka report; will the names of police transfer agents and over 40 police officers be reveled now??

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*