आता भाजपाच्या एजंट आहेत म्हणणाऱ्या रश्मी शुक्ला यांचा राष्ट्रवादीच्याच आघाडी सरकारने तीन वेळा केला होता गौरव

कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या एजंट म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून आरोप होत आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्याच गृहमंत्र्यांनी आघाडी सरकारच्या काळात तीन वेळा त्यांचा गौरव केला होता.Rashmi Shukla, who now claims to be an agent of the BJP, was honored three times by the NCP-led government


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या एजंट म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून आरोप होत आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्याच गृहमंत्र्यांनी आघाडी सरकारच्या काळात तीन वेळा त्यांचा गौरव केला होता.

गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटसंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठविले होते. हे पत्र उघड झाल्यावर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्या भाजपाच्याा एजंट असल्याचा आरोप केला. 2019 मध्ये सत्तास्थापनेच्या नाट्यावेळी रश्मी शुक्ला यांनी भाजपच्या विरोधात असणाऱ्या राजकीय नेत्यांचे फोन टॅप केले होते,असा आरोप मलिक यांनी केला.



 

पण राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या गृहमंत्र्यांच्या काळात त्यांचा एक वेळा नव्हे तर तीन वेळा उत्कृष्ठ सेवेसाठी सन्मान झाला होता. १९८८ च्या बॅचच्या अधिकारी असलेल्या रश्मी शुक्ला यांना 2004 मध्ये पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह त्यांना बहाल करण्यात आले होते. मा. राष्ट्रपती, भारत सरकार यांनी सन 2005 मध्ये गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक देऊन शुक्ला यांचा गौरव केला होता. 2013 मध्ये प्रशंसनिय सेवेबद्दल पोलीस पदक देऊन त्यांना गौरविण्यात आले होते.

रश्मी शुक्ला यांचे कुटुंब मुळचे उत्तर प्रदेशातील अलाहाबादचे असले तरी त्यांचा जन्म आणि पूर्ण कारकिर्द मुंबईमध्येच घडली. १५ आॅगस्ट १९६५ रोजी त्यांचा मुंबईमध्ये जन्म झाला. मुंबई विद्यापीठातून त्यांनी भूगर्भशास्त्रात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात त्या उत्तीर्ण झाल्या. १९८८ मध्ये त्या भारतीय पोलीस सेवेत दाखल झाल्या.

मुंबईतील २००८ च्या दहशतवादी हल्याच्यावेळी त्यांनी सरकारबरोबर समन्वयक म्हणून काम केले होते. तटरक्षक दलाच्या अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले. यावेळी दहशतवादी कारवायांमुळे तटरक्षक दलाची जबाबदारी वाढली होती. तटरक्षक दलाला नवा चेहरा देण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे २००८ नंतर कधीही सागरी मार्गाने दहशतवाद्यांना महाराष्ट्रात किंवा मुंबईत घुसता आले नाही.

 

अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि गुप्तचर विभागाच्या प्रमुख म्हणून काम करताना त्या दहशतवाद्यांच्या विरोधात लढल्या होत्या. महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख म्हणून काम पाहिलेल्या, भारतीय पोलीस सेवेतील त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. ३१ मार्च २०१६ मध्ये त्यांनी पुरे पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. या पदावर काम करणाऱ्या त्या दुसऱ्या महिला अधिकारी आहेत.

पुण्यातील महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर त्यांनी खूप काम केले. या शहरासाठी मी काय करणार? हे मी केवळ तोंडी न सांगता माझे कामच बोलेल असे त्यांनी पुणे पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यावर त्या म्हणाल्या होत्या. त्यांनी आयटीयन्स आणि महिलांना तत्काळ पोलिसांची मदत मिळण्यासाठी बडी कॉप हे अ‍ॅप्लीकेशन त्यांनी सुरू केले.

स्वत:चा मोबाईल क्रमांक जाहीर करुन नागरिकांना त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तो उपलब्ध करुन देणाºया पहिल्या महिला पोलीस आयुक्त त्या ठरल्या. शुक्ला यांनी पुणे शहरात प्रथमच ज्येष्ठ नागरिकांसाठी 1090 ही हेल्पलाईन सुरु केली.

पुण्याच्या पोलीस आयुक्त असताना कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीची पाळेमुळे त्यांनी खणून काढली. त्या हिंसाचाराला एल्गार परिषद जबाबदार असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेच्या अनेक समर्थकांना अटक करून शहरी नक्षलवाद्यांवर घाव घातला.

Rashmi Shukla, who now claims to be an agent of the BJP, was honored three times by the NCP-led government

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*