राजकीय दबावानंतर धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे?, जबाब बदलू नये म्हणून पीडितेला द्यावे लागणार प्रतिज्ञापत्र

rape complaint against Dhananjay Munde withdrawn after political pressure, victim to give affidavit not to change Statement

महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादीचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात दाखल झालेली बलात्काराची तक्रार रेणू शर्माने मागे घेतली आहे. 10 जानेवारी रोजी मुंबईतील ओशिवारा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादीचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात दाखल झालेली बलात्काराची तक्रार रेणू शर्माने मागे घेतली आहे. 10 जानेवारी रोजी मुंबईतील ओशिवारा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी पीडितेला प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितले आहे, जेणेकरून नंतर जबाब बदलता येऊ शकणार नाही. rape complaint against Dhananjay Munde withdrawn after political pressure, victim to give affidavit not to change Statementराजकीय दबावानंतर तक्रार मागे?
या प्रकरणातील पीडितेने सांगितले की, धनंजय मुंडे यांच्याविरोधातील तक्रार माध्यमांसमोर आली. यानंतर अनेक राजकीय नेतेमंडळींनी खुन्नस काढायला सुरुवात केली. यामुळे मी तक्रार मागे घेत आहे. दरम्यान, पीडितेने पोलिसांना सांगितले होते की, तिची बहीण आणि मुंडे यांचे नाते फार चांगले नाही, यामुळे तीसुद्धा खूप तणावात आहे. एकीकडे, धनंजय मुंडे यांनी पीडितेच्या बहिणीशी असलेल्या नात्याची जाहीर कबुली देऊन टाकली आहे. त्यांना दोन मुले असल्याचेही सांगण्यात आले आहे.

बलात्काराची तक्रार दाखल झाल्यावर अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. यानंतर या प्रकरणात भाजप नेते कृष्णा हेगडे व मनसेच्या मनीष धुरी यांनी उडी घेत पीडित महिलेवरच उलट आरोप केले होते. हनी ट्रॅपचं जाळं पसरवून अडकवण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले. दोघांनाही पीडितेचा असाच अनुभव आल्याचा दावा त्यांनी केला होता. यानंतर काही दिवसांपूर्वीच पीडित महिलेने, “मी महाराष्ट्रात एकटीच लढत आहे. कोणतीही माहिती नसताना माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत. तुमची सर्वांची इच्छा असेल, तर मी माघार घेते”, असं ट्विट केलं होतं. त्यानंतर आता तिने तक्रार मागे घेतली आहे.

rape complaint against Dhananjay Munde withdrawn after political pressure, victim to give affidavit not to change Statement

मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभरात आंदोलने 

बलात्काराच्या आरोपानंतर भारतीय जनता पक्षाचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. भाजप महिला आघाडीच्या वतीने धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली होती. परंतु आता राजकीय दबावाला बळी पडून पीडितेने आपली तक्रार मागे घेतल्याचे दिसून येत आहे. यामुळे हे प्रकरण बंद होईल, कारण यात कोणतीही एफआयआर नोंदवण्यात आली नव्हती. दुसरीकडे, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तक्रार मागे घेणाऱ्या पीडितेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राज्यात यामुळे चुकीचे उदाहरण सेट होईल, असे त्या म्हणाल्या.

rape complaint against Dhananjay Munde withdrawn after political pressure, victim to give affidavit not to change Statement

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी