धनंजय मुंडे यांच्या विरोधात तरूणीची बलात्काराची तक्रार; बड्या नेत्यांना ट्विट केली तक्रारीची कॉपी


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा गंभीर आरोप रेणू शर्मा या गायिकेने केला आहे. तिने मुंबई पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांच्या नावे एक पत्र लिहिले असून त्या पत्राची कॉपी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून सगळ्या बड्या नेत्यांना टॅग करून सोशल मीडियावर टाकली आहे. rape charges against social justice minister and NCP leader by mumbai girl

एका तरूणीने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ही तरुणीने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेली होती. परंतु, पोलिसांनी तिच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे.


कमळावर निवडून आलेल्या परळीतल्या तीन पंचायत सदस्यांना धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत घेतले, दुसऱ्याच दिवशी ते तोंडघशी पडले!!


धनंजय मुंडे यांचे तिची बहीणीशी लग्न झाल्याचा दावाही या तरूणीने केला आहे. तसेच धनंजय मुंडे यांनी अत्याचार केला असल्याचा आरोप या तरूणीने करून तिच्या ट्विटर अकाऊंट संबंधित पत्रही शेअर केले आहे

rape charges against social justice minister and NCP leader by mumbai girl

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस, मुंबई पोलीस आयुक्त, खासदार सुप्रिया सुळे यांना ट्विटमध्ये या तरूणीने टॅग करून तिला मदत करण्याची विनंती केली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती