बिचाऱ्या शिवसेनेवर संगतीचा परिणाम; दानवेंचा टोला

शिवसेनेने यासाठी अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ गुअराती मतदारांना साद घातली आहे. raosaheb danve shivsena latest news


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपासोबतची युती तुटल्याने शिवसेनेसमोर खूप मोठे आव्हान उभे राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आतापासूनच मुंबई महापालिका जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

शिवसेनेने यासाठी अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ गुअराती मतदारांना साद घातली आहे. दरम्यान एका बाजूला भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे तर दुसऱ्या बाजूला शिवसेना देखील अमराठी मतांसाठी जोरदारपणे मेळावे आयोजित करत आहे.शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कधीकाळी मित्रपक्ष असलेल्या भाजपने शिवसेनेच्या या बदलत्या भूमिकेवर खोचक टीकास्त्र सोडले आहे. आता, भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील शिवसेनेला लक्ष्य केले आहे.

‘शिवसेनेची भूमिका परप्रांतीयांच्याबाबत अनेकवेळा समोर आलेली आहे. आता सत्तेत आल्यावर त्यांची भूमिका आपण पाहत आहोत. भविष्यात ते मुस्लिम समाजाचादेखील मेळावा घेऊ शकतात. कारण त्यांची बिचाऱ्यांची भूमिका बदलली. हा संगतीचा परिणाम आहे. कदाचित अन्य पक्षाच्या सोबत राहिल्यावर त्यांची भूमिका बदलली असेल’, असा खोचक टोला दानवेंनी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना लगावला आहे.

औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन राजकीय वातावरण तापले असतानाच आता या मुद्द्यावरुन रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला घेरले आहे. १९९६ साली भाजप आणि शिवसेनेच्या युतीचे सरकार असताना विधीमंडळात औरंगाबाद शहराचे नाव संभीजीनगर होईल, असा ठराव झाला होता. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर व्हावे अशी भाजपसोबत शिवसेनेची देखील तेव्हा स्पष्ट भूमिका होती. शिवसेनेने त्या भूमिकेपासून दूर जाऊ नये. संभाजीनगर नावाला आमचे समर्थन आहे. संभाजी महाराजांच्या नावाला काँग्रेस विरोध करत असेल तर आता शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

raosaheb danve shivsena latest news

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*