राणे महाराष्ट्राचे दबंग नेते, झोप विसरून मेहनत करतात, देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतुक


नारायण राणे महाराष्ट्राचे दबंग नेते आहेत. झोप विसरून ते मेहनत करतात. मेडिकल कॉलेजच्या निमित्ताने त्यांची स्वप्नपूर्ती होत असल्याच्या शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राणे यांचे तोंड भरून कौतुक केले. Rane, the domineering leader of Maharashtra, forgets sleep and works hard, praised by Devendra Fadnavis


विेशेष प्रतिनिधी

सिंधूदुर्ग : नारायण राणे महाराष्ट्राचे दबंग नेते आहेत. झोप विसरून ते मेहनत करतात. मेडिकल कॉलेजच्या निमित्ताने त्यांची स्वप्नपूर्ती होत आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राणे यांचे तोंड भरून कौतुक केले.


शिवसेनेत सगळं बटण दाबून करतात, मातोश्रीला जाळ्या लावल्यात, नारायण राणे यांची टीका


सिंधुदुर्ग येथे नारायण राणे यांच्या लाइफ टाइम मेडिकल कॉलेजचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील दबंग नेता म्हणून नारायण राणेंना पाहिले जाते. एखादं स्वप्न पाहिल्यावर झोप विसरून नारायण राणे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करतात. सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेज उभारणे हा फार धाडसी निर्णय होता. 650 हॉस्पिटल उभारणे हे खूप आव्हानात्मक आहे.

मी नारायण राणेंचा संघर्ष अतिशय जवळून पाहिला आहे. मेडिकल कॉलेज उभारताना अनेक अडचणी आल्या. इतके इन्स्पेक्शन होतात. वेगवेगळ्या प्रकारच्या तरतूदी असतात. इतकी गुंतवणूक केल्यानंतर वर्ष-दोन वर्षे वाट पाहावी लागते. या सगळ्या गोष्टींना सामोरे जात त्यांनी सगळा पाठपुरावा केला. अखेर या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन झाले. या स्वप्नपूतीर्चा आनंद राणेंच्या चेहऱ्यावर पाहतोय, असे फडणवीस म्हणाले.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, नारायण राणे हे खूप हुशार राजकारणी आहेत. त्यांनी आपल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी अमित शाह यांच्या रुपाने अत्यंत योग्य व्यक्तीची निवड केली. हा सामान्य माणसाच्या हिताचा विचार करणारा नेता आहे. कोकणातील अनेकजण नोकऱ्यांसाठी मुंबईत जातात. हे लोक मुंबईतील झोपडपट्टीत आनंदाने राहत नाहीत. मात्र, त्यांना नाईलाजाने पोटापाण्यासाठी तेथे राहावे लागते. त्यामुळे नारायण राणे यांनी कोकणात रोजगारनिर्मितीसाठी अमित शाह यांना साकडे घालावे.

Rane, the domineering leader of Maharashtra, forgets sleep and works hard, praised by Devendra Fadnavis

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती