Ramdas Athavale said, Rajya Sabha needs Ghulam Nabi, if Congress does not bring him back, we will

रामदास आठवले म्हणाले, गुलाम नबींची राज्यसभेला गरज, काँग्रेसने परत नाही आणले तर आम्ही आणू… कविता म्हणताच हसू लागले अख्खे सभागृह

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह जम्मू-काश्मीरमधील चार राज्यसभेच्या खासदारांना त्यांची मुदत संपल्यानंतर निरोप देण्यात आला. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) नेते रामदास आठवले म्हणाले की, गुलाम नबी आझाद यांनी पुन्हा सभागृहात यावे. जर कॉंग्रेस तुम्हाला परत आणत नसेल, तर आम्ही तसे करण्यास तयार आहोत. या सभागृहाला तुमची गरज आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चारही नेत्यांचे आभार मानले. Ramdas Athavale said, Rajya Sabha needs Ghulam Nabi, if Congress does not bring him back, we will


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह जम्मू-काश्मीरमधील चार राज्यसभेच्या खासदारांना त्यांची मुदत संपल्यानंतर निरोप देण्यात आला. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) नेते रामदास आठवले म्हणाले की, गुलाम नबी आझाद यांनी पुन्हा सभागृहात यावे. जर कॉंग्रेस तुम्हाला परत आणत नसेल, तर आम्ही तसे करण्यास तयार आहोत. या सभागृहाला तुमची गरज आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चारही नेत्यांचे आभार मानले.रामदास आठवलेंनी गुलाम नबी यांचे कौतुक करत म्हटले की, “तुमचा स्वभाव खूप चांगला आहे. तुम्ही मोठ्या मनाचे व्यक्ती आहात. तुम्ही या सदनात पुन्हा आले पाहिजे. जर काँग्रेस तुम्हाला येथे आणू इच्छित नसेल तर आम्ही आणण्यात तयार आहोत. आणि येथे येण्यात कोणतीही अडचण नाही. मीसुद्धा तिकडे होतो, पण आता इकडे आलो आहे. तुम्हाला काय अडचण आहे? तुम्ही पुन्हा सदनात आले पाहिजे. हीच आमची अपेक्षा आणि आशा आहे.”

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुलाम नबींवर कविता सादर केली. या कवितेनंतर सभागृहातील सर्व दिग्गज नेते हसू लागले.

रामदास आठवलेंची कविता

राज्यसभा छोड़कर जा रहे गुलाम नबी
राज्यसभा छोड़कर जा रहे गुलाम नबी…
हम मिलते रहेंगे आपको कभी कभी
आपका नाम है गुलाम, इसलिए मैं करता हूं आपको सलाम
आपका नाम है गुलाम, लेकिन आप हमेशा रहे आजाद
आप हम सभी को रहेंगे याद
15 अगस्त को देश हुआ आजाद, लेकिन राज्यसभा से आप आज हो रहे आजाद
आप हमेशा रहो आजाद, हम रहेंगे आपके साथ… ये अंदर की है बात
मोदी जी जम्मू-कश्मीर का मजबूत करेंगे हाथ और आपका देते रहेंगे साथ…गुलाम नबींना निरोप देताना भावुक झाले पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा राज्यसभेला संबोधित केले. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह जम्मू-काश्मीरमधील चार राज्यसभेच्या खासदारांना त्यांची मुदत संपल्यानंतर निरोप देण्यात आला. पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेसच्या नेत्याचे कौतुक करत एका दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. या घटनेचा संदर्भ देताना पंतप्रधानांना अश्रु अनावर झाले.

Ramdas Athavale said, Rajya Sabha needs Ghulam Nabi, if Congress does not bring him back, we will

Ramdas Athavale said, Rajya Sabha needs Ghulam Nabi, if Congress does not bring him back, we will

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*