‘अयोध्या’ एक संदर्भ ग्रंथ; अयोध्येतील राममंदिर म्हणजे अस्मितेवरील आघाताला प्रत्युत्तर – चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील म्हणाले की, परकीय आक्रमकांनी आपली अस्मिता नष्ट करण्यासाठी आणि देशाला तोडण्यासाठी मंदिरं उद्ध्वस्त केली. अयोध्येतील प्रभू श्रीरामांचे राम मंदिर हे त्यापैकीच एक होते. Ram Mandir in Ayodhya Chandrakant Patil news


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य राम मंदिर म्हणजे लाखो भारतीयांच्या अस्मितेवरच्या आघाताला चोख प्रत्युत्तर असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी लिखित ‘अयोध्या’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, परकीय आक्रमकांनी आपली अस्मिता नष्ट करण्यासाठी आणि देशाला तोडण्यासाठी मंदिरं उद्ध्वस्त केली. अयोध्येतील प्रभू श्रीरामांचे राम मंदिर हे त्यापैकीच एक होते. या घटनेमुळे भारतीय जनमानसावर आघात झाला होता. अनेक वर्षे ती भळभळती जखम होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता अयोध्येत भव्य राम मंदिर उभारले जात आहे. ते केवळ मंदिर नाही, तर लाखो भारतीयांच्या अस्मितेवर जो आघात झाला होता, त्याला चोख प्रत्युत्तर आहे.राम मंदिर उभारणीचा इतिहास पुढच्या पिढीला समजणे आवश्यक आहे. यासाठी माधव भांडारी यांनी सखोल अध्ययन करुन, हे पुस्तक लिहिले आहे. ते पुढच्या पिढीला प्रेरणा देणारे ठरेल असेही ते म्हणाले.

Ram Mandir in Ayodhya Chandrakant Patil news

प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या नंतर या देशाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रुपाने महापुरुष मिळाला. इ. स. १५२८ मध्ये मीरबाकीने अयोध्येतील प्रभू श्रीरामांचे मंदिर उद्ध्वस्त करुन आपल्या धर्मावर, संस्कृतीवर आघात केला. तेव्हापासून मंदिरासाठी संघर्ष सुरू आहे. आता हा संघर्ष संपला असून, भव्य राम मंदिर आकाराला येत आहे. या मंदिराच्या भव्यत्वाला मर्यादा येतील. पण दियत्वाला नसतील. हे पुस्तक सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल. यात जे दाखले दिले आहेत, ते अतिशय महत्त्वाचे आहे. यामुळे एक समग्र ग्रंथच उपलब्ध झाला आहे. – श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र विकासाचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*