अश्रू ढाळण्यापूर्वी कट्टर खलिस्तानवाद्यांकडून राकेश टिकैत यांना तंबूत घुसून बेदम मारहाण? प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यावर राकेश टिकैत यांना पत्रकार परिषदेत अश्रू ढाळतानाची दृश्ये पुढे आली होती. पण, त्यापूर्वी काही कट्टर शिखांनी त्यांना मारहाण केली होती. थप्पड मारून आणि लाथा घालून त्यांना बडविले होते. तसेच आंदोलनासाठी दिलेले पैसे परत मागण्यासाठी मुदत दिली होती?, अशी धक्कादायक माहिती पुढे येत आहे. Rakesh Tikit sheds tears as hardliners beat up khalistans

शेतकरी आंदोलनाविरोधात जनतेत रोष प्रकट होताच कट्टर शीख संतप्त झाले. खालिस्तानवादी जाटांनी काही प्रक्षोभक व्हिडीओही प्रसारीत केले होते. गाझीपूर सीमेवर टिकैत यांना पत्रकार परिषदेत आश्रू ढाळताना पाहून अनेकांना धक्काच बसला होता. जे टिकैत एक दिवस अगोदर दिल्लीला, पोलिसांना धमकावत होते, ट्रॅक्टर खाली चरडून टाकू, असे सांगणारे तेच आता रडत होते. हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.त्याचे कारण ऐकून वाचकांना धक्का बसेल अशी घटना घडली आहे. पत्रकार परिषदेपूर्वी काही मिनिट अगोदर आंदोलनासाठी पैसे पुरविणारी खलिस्तानवादी मंडळी त्यांना भेटण्यास आली होती. ते टिकैत यांच्यावर नाराज होती.

उपस्थित लोकांनी सांगितले की, काही सरदार आले. आई, बहिणीवरून शिव्या देत टिकैत यांना तंबूत घेऊन गेले. तेथे त्यांना थप्पड मारून आणि लाथ घालून जमिनीवर पाडले होते. आंदोलनासाठी दिलेले पैसे परत द्या, असा तगादा लावला. त्यामुळे टिकैत कॅमेरासमोर रडत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. धमकीमुळे त्यांचा रात्री रक्तदाबही वाढला होता. पोलिसांनी पाठविलेल्या डॉक्टरांनी उपचार केले.

Rakesh Tikit sheds tears as hardliners beat up khalistans

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था